आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीय

आगामी विधासभा निवडणूक पारदर्शकपणे पार पाडा : निवडणूक निर्णय अधिकारी सुरेखा चव्हाण

नांदगाव विधानसभेत वाढले साडेनऊ हजार मतदार..

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा

नांदगाव ता..१९ निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करावे आदर्श आचार संहितेचे काटेकोर पालन कसे होईल याबाबत यंत्रणेने सतर्क राहावे अशा सूचना दिल्या.या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असुन मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आमची सर्व तयारी झाली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथाउपजिल्हाधकारी श्रीमती सुरेखा चव्हाण यांनी दिली आहे तहसीलदार सुनील सौदाणे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ११३ नांदगाव विधानसभा मतदारसंघात प्रशासनाने जय्यत तयारी केली असुन लोकसभा निवडणुकीनंतर जवळपास १५ बूथ संख्या वाढून ती आता ३४१ मतदान केंद्र एवढी झाली आहे तर एकूण ३ लाख ४० हजार ३७८ मतदार आपल्या मतांचा हक्क बजावतील यात १ लाख ७७ हजार चारशे सहव्वीस पुरुष मतदार आहेत. तर १लाख ६२ हजार नऊशे अठेचाळीस स्री मतदार व इतर ४ मतदार आहेत

नांदगाव विधानसभा मतदारसंघात यंदा नऊ हजार पेक्षा जास्त नवमतदार समाविष्ट करण्यात आले आहेत तर १९ ऑक्टोबर पर्यंत ज्यांचे नाव नोंदणी बाकी असेल त्यांना नाव नोंदणी करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे याशिवाय वय वर्ष ८५ पेक्षा जास्त असणाऱ्या व मतदार केंद्रावर जाऊन मतदान करण्यासाठी असक्षम असणाऱ्या मतदारांनी फॉर्म १२ डी भरून द्ययाचा आहे यासाठी त्यांनी बीएलओ ची मदत घेऊन हा फॉर्म भरून द्ययाचा आहे त्यानुसार त्यांना त्यांच्या घरीच मतदान केंद्र बनवून त्यांचे निवडणूक आयोगाने घालुन दिलेल्या नियमानुसार गुप्त मतदान घेण्यात येईल सदर व्यक्ती ही १ वेळा घरी नाही सापडली तर पुन्हा दुसरी तारीख देऊन मतदान अधिकारी घरी जाऊन पुन्हा मतदान घेतील मात्र तेंव्हाही ते घरी सापडले नाहीत तर मात्र त्यांना मतदान करता येणार नाही याशिवाय नांदगाव विधानसभा मतदारसंघात तीन महिला संचलित मतदान केंद्र असणार आहे. एक आदर्श मतदान केंद्र, एक दिव्यांग अधिकारी (PWD) द्वारे संचलित मतदान केंद्र व एक युवा संचलित मतदान केंद्र निर्माण केले जाणार असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी श्रीमती सुरेखा चव्हाण यांनी दिली. ही निवडणुक प्रक्रिया पार पाडण्यासाठी १९२३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असुन निवडणूकीची मुख्य धुरा या कर्मचारी वर्गाच्या खांद्यावर आहे. नांदगाव विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदान केंद्रापैकी पन्नास टक्के मतदान केंद्रावर वेबकॉस्टींग होणार आहे. आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी साठी मतदार संघात फिरती पथके, स्थिर सर्वेक्षण पथके, व्हीडिओ सर्वेक्षण पथके, निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत असणार आहे. तसेच मतदान केंद्राच्या संख्येनुसार ३६ सेक्टर ऑफिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सर्व मतदान केंद्रावर मतदारांसाठी पिण्याचे पाणी, शौचालय, वाहनतळ, पार्किंग, व्हील चेअर, इ. व्यवस्था असणार आहे. सन २०१९ च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत ११३ नांदगाव विधानसभा मतदारसंघात ५९.८९.% मतदान झाले होते. या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होत मतदान करावे यासाठी प्रशासनाकडुन जोरदार प्रचार मोहीम राबविण्यात येत असल्याचे चव्हाण श्रीमती यांनी सांगितले.

@@@@#

जिल्ह्यात चार लाख ८३ हजार मतदारांची वाढ ..
पंधरा विधानसभा मतदारसंघांत ५० लाख २८ हजार मतदारः ४,९२६ मतदान केंद्रे

प्रतिक्रिया……
नांदगाव विधानसभा मतदार संघात ९ हजार ५७४ नवमतदार व १५ मतदान केंद्र वाढले आहेत. वय वर्ष ८५ वरील ६ हजार ३९९ मतदारांची संख्या या मतदारसंघात आहे. तर दिव्यांग १हजार ४९१ मतदार आहेत. मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर त्यांच्या मदतीकरिता स्वयंसेवक नेमले जाणार आहेत. याशिवाय यांना मतदान केंद्रावर घेऊन जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी आपले कर्तव्य समजून काम करावे जेणेकरून १०० टक्के मतदान होईल व लोकशाही बळकट होईल

सुरेखा चव्हाण – निवडणुक निर्णय अधिकारी नांदगाव विधान सभा

@@@@@@

विधानसभेच्या निवडणकीच्या पश्र्वभूमीवर आमची

संपूर्ण तयारी झाली असून, या प्रक्रियेत सहभागी कर्मचारीवर्गाला प्रशिक्षण देण्यात आले आहे. संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील.

– सुनील सैंदाणे – तहसीलदार, नांदगाव

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.