आपला जिल्हामहाराष्ट्र

नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दै. लोकमतचे संजय मोरे बिनविरोध निवड

कार्याध्यक्षपदी रईस शेख, तर सचिवपदी आमिन शेख यांची निवड

गर्जा महाराष्ट्र२४ न्यूज वृत्तसेवा

नांदगाव ता.२९ नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ सल्लग्न नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी संजय मोरे तर सरचिटणीसपदी दैनिक गांवकरीचे आमिन नवाब शेख यांची बिनविरोध निवड झाली.

.
नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाची वार्षिक आढावा बैठक येथील शिवनेरी शासकीय विश्रामगृहात अध्यक्ष सुरेश शेळके यांच्या अध्यक्षतेखाली तथा जेष्ठ मार्गदर्शक संजीव धामणे,विजय चोपडा,बब्बुभाई शेख,संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. यावेळी बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात येवून नुतन कार्यकारणीची बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये तालुकाध्यक्षपदी संजय मोरे,कार्याध्यक्ष रईस शेख, उपाध्यक्ष चंचल गंगवाल,संतोष खताळ,सरचिटणीस अमिन शेख, सह सरचिटणीस महेश पेवाल,कोशाध्यक्ष अनिल आव्हाड,सह कोशाध्यक्ष सचिन गायकवाड,संघटक मोहम्मद शेख,सह संघटक बाबासाहेब काळे,प्रसिद्धी प्रमुख सतिष परदेशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी जेष्ठ पत्रकार बब्बुभाई शेख यांनी प्रास्ताविक केले त्यांनी सांगितले की, अनेक सदस्य अपप्रचाराला बळी पडून गैरसमजामुळे बाहेर गेले होते ते पुन्हा मुळ संघटनेच्या स्वगृही परतले आहेत त्यांचे आम्ही स्वागत करतो व यापुढे मोठ्या जोमाने कामाला सुरुवात करण्याच्या शुभेच्छा दिल्या.नवनिर्वाचित कार्यकारणी सरचिटणीस अमिन शेख यांनी जाहीर केली.यावेळी नुतन तालुकाध्यक्ष संजय मोरे यांनी बोलताना सांगितले की,आगामी काळात सर्वांना सोबत घेऊन पत्रकार संघाच्या वतीने विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असून,जानेवारी महिन्यात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने नांदगाव शहरात भव्य कार्यक्रम करण्यात येणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी जेष्ठ पत्रकार विजय चोपडा यांनी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची सुचना केली.जेष्ठ पत्रकार संजीव धामणे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की,सर्वांनी रुसवे फुगवे विसरून एकदिलाने संघटनेसाठी काम करावे असे आवाहन केले.

.नुतन कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांसह पत्रकार संघाच्या वतीने आमदार सुहास कांदे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे दुसऱ्यांदा आमदार झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला.

यावेळी,हिरामन मनोहर,सुहास पुणतांबेकर,अनिल धामणे,मंगेश सोनस, अजहर शेख,सचिन पांडे,गणेश जाधव,निखिल मोरे,आवेश कुरेशी,जुनैद शेख आदी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.