आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

बीटस्तरीय स्पर्धेत बाणगाव बुद्रुक शाळेचे वर्चस्व

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा

बाण गाव बुद्रुक , ता. २९ :कासारी येथील विद्यालयाच्या प्रांगणात बाणगाव ,कासारी,पोखरी केंद्रस्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थी व संघांच्या बीटस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष करंडक स्पर्धेतर्गत कला क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. यातील सामूहिक नृत्य मोठ्या गटाच्या स्पर्धेत बाणगाव बुद्रुक येथील शाळेने वर्चस्व राखले आहे.

केंद्रस्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या बीटस्तरावर स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धांमध्ये प्रथम आलेल्या संघ व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व शैक्षणिक वस्तू बक्षीस देण्यात आले.स्पर्धेच्या पुढील टप्प्यात तालुकास्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती नंदा ठोके यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले.बिटस्तरीय स्पर्धेत बाणगाव.शाळेच्या विद्यार्थिनीचा सामूहिक नृत्य मोठ्या गटात प्रथम क्रमांक मिळाला त्याना शाळेच्या शिक्षिका श्रीमती गीता भांबेरे, हर्षा बिसदररे,मेढे,सुरसे,खैरे,नगे व मुख्याध्यापक संजय शेवाळे यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी विद्यार्थ्यांचे जेष्ठ नेते बापुसाहेब कवडे सरपंच संगीता बागुल स्कुल कमिटीचे अध्यक्ष संदीप कवडे यांनी अभिनंदन केले

फोटो ओळ
कासारी – येथे बिटस्तरीय स्पर्धेत बाणगाव बुद्रुक. शाळेच्या विद्यार्थिनीचा सामूहिक नृत्य मोठ्या गटात प्रथम क्रमांक मिळाला बदल शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती नंदा ठोके यांच्या हस्ते प्रमाणपत्र स्विकारताना विद्यार्थ्यांनी व शाळेच्या शिक्षिका श्रीमती गीता भांबेरे,हर्षा बिसदररे, मेढे,सुरसे,खैरे,नगे व मुख्याध्यापक संजय शेवाळे आदी

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.