महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकार संघटनेच्या अध्यक्षपदी कैलास चव्हाण तर राज्य प्रसिध्दी प्रमुख राहुल कुटे, यांची निवड
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेची राज्य कार्यकारिणीची निवडणूक उत्साहात

गर्जा महाराष्ट्र२४ न्यूज वृत्तसेवा
नांदगाव ता. २९ : राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्या स्थापनेनंतर दुसऱ्यांदा राज्य कार्यकारिणी निवडणूक होउन राज्याध्यक्ष कैलास चव्हाण यांची निवड झाली. कार्याध्यक्षा (महिला) श्रीमती तृप्ती भामरे, सचिव मनोज पाटील, सहसचिव आशिष हेमके, कोषाध्यक्ष लेखापाल अर्जुन गुट्टे, राज्य प्रसिध्दी प्रमुख राहुल कुटे, योगेश घुगे, अमोल इंगळे, शिवनंदन राजपुत, रोशनी मोरे, मंगेश बोंद्रे, बळीराम बेलकर, दत्तात्रय गायकवाड, संभाजी कार्ले यांची निवड झाली. पदसिद्ध सदस्य म्हणून सर्व विभाग कार्यकारिणी विभाग अध्यक्ष, विभाग कार्याध्यक्षा व विभाग सचिव यांची घोषणा करण्यात आली.

पुढील तीन वर्षांसाठी.पदाधिकारी यांची
निवड
.राज्याध्यक्ष – कैलास चव्हाण कर व प्रशासकीय अधिकारी,कार्याध्यक्षा (महिला) – श्रीमती तृप्ती भामरे लेखापाल व लेखापरीक्षक,.सचिव – मनोज पाटील कर व प्रशासकीय अधिकारी,सहसचिव – आशिष हेमके संगणक अभियंता, कोषाध्यक्ष -अर्जुन गुट्टे लेखापाल व लेखापरीक्षक, राज्य प्रसिध्दी प्रमुख – राहुल कुटे कर व प्रशासकीय अधिकारी,.उपाध्यक्ष तथा अध्यक्ष कर व प्रशासकीय सेवा – योगेश घुगे, उपाध्यक्ष तथा अध्यक्ष लेखा सेवा – अमोल इंगळे लेखापाल व लेखापरीक्षक,उपाध्यक्ष तथा अध्यक्ष स्थापत्य सेवा – शिवनंदन राजपुत स्थापत्य अभियंता,उपाध्यक्ष तथा अध्यक्ष संगणक सेवा- श्रीम. रोशनी मोरे संगणक अभियंता,उपाध्यक्ष तथा अध्यक्ष विद्युत सेवा- मंगेश बोंद्रे विद्युत अभियंता,उपाध्यक्ष तथा अध्यक्ष पाणीपुरवठा सेवा – बळीराम बेलकर पाणीपुरवठा अभियंता,उपाध्यक्ष तथा अध्यक्ष स्वच्छ्ता निरीक्षक सेवा- दत्तात्रय गायकवाड स्वच्छ्ता निरीक्षक,.उपाध्यक्ष तथा अध्यक्ष अग्निशमन सेवा – संभाजी कार्ले अग्निशमन अधिकारी याची निवड झाली. पदसिद्ध सदस्य म्हणून सर्व विभाग कार्यकारिणी विभाग अध्यक्ष, विभाग कार्याध्यक्षा व विभाग सचिव यांची घोषणा करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राहुल पिसाळ तर सहा.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती भाग्यश्री कदम यांनी कामकाज पाहिले.



