आपला जिल्हामहाराष्ट्र

आमदार सुहास आण्णांनी मतदारसंघात सर्वधर्म समभाव वृत्ती ठेवत करोडो रुपयांची विकासकामे लोकांनी मागणी न करता ही करून दिलीत. : समाज सेविका अंजुमताई कांदे

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा
नांदगाव ता ३१: अल्पसंख्यांक वस्तीत यापूर्वी कुठलेही विकासकामे झाली नसल्याने या समाजाने आता आपले कुठलेच काम होत नसल्याचा गैरसमज करून घेतला होता.आणि साहजिकच ही संकल्पना त्या त्या राजकीय नेतृत्वाच्या दुर्लक्षामुळे प्रत्येकाच्या मनात खोल रुजली होती. मात्र याला विद्यमान आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सर्वधर्म समभाव वृत्ती ठेवत करोडो रुपयांची विकासकामे कामे लोकांनी मागणी न करता ही करून दिलीत. असे प्रतिपादन महिला स्वयंरोजगाराच्या प्रणेत्या सौ. अंजुमताई कांदे यांनी केले.


नांदगाव नगरपरिषद हद्दीत असलेल्या ईदगाह व शादीखाना साठी आ. सुहास कांदे यांनी अल्पसंख्यांक बहुल क्षेत्र विकास अनुदान अंतर्गत योजनेतून सुमारे ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून आणला.या कामाचे भूमिपूजन सौ.अंजुमताई कांदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
आमदार म्हणून निवड झाल्यानंतर आमदार सुहास आण्णा कांदे यांनी कामाला सुरुवात ही केली आहे. दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतरच्या मतदार संघातील पहिल्या विकासकामाचे भूमिपूजन झाले. या ठिकाणी करोडो रुपयांचा निधी खर्चून ईदगाह, व शादीखाना यापूर्वीच आ. कांदे यांनी बांधून दिले आहेत.तसेच या मतदार संघात यापूर्वी कधीच धार्मिक तेढ नव्हती. आणि भविष्यात ही ती होणार नाही. असा विश्वास सौ. अंजुमताई कांदे यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी नांदगाव नगरपरिषद चे मुख्याधिकारी श्यामकांत जाधव,राहुल कुटे,शिवसेना महिला आघाडीच्या उज्वला खाडे,अड विद्या जगताप,रोहिणी मोरे,पूजा छाजेड,नेहा कोळगे,भारती बागोरे,सोनिया सोर,नजमा मिर्झा, याकूब शेख,मुज्जू शेख,योगिता बच्छाव आदीसह या परिसरातील शेकडो महिला,पुरुष व रहेनुमा फाउंडेशन चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक अय्याज शेख यांनी तर सूत्रसंचालन सुनील जाधव यांनी केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.