नांदगांवला पत्रकार दिनी पत्रकारांसाठी गुप्ता मेडिकेअर हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी.
तालुक्यातील ६० च्यावर पत्रकारांची झाली आरोग्य तपासणी

.गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा
नांदगांव ता०७ पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती सोमवारी (ता ०६ ) रोजी ” पत्रकार दिन ” म्हणून साजरा करण्यात आला. पत्रकार दिनाचे औचित्य साधत नांदगाव येथील गुप्ता मेडिकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने नांदगाव तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करत त्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

सहा जानेवारी हा दिवस आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती सर्वत्र साजरी करण्यात येते पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो या पत्रकार दिनाचे औचित्य साधत नांदगाव येथील प्रसिद्ध गुप्ता मेडिकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. परीतोष अशोक गुप्ता तसेच डॉ. सौ. हर्षदा गुप्ता यांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून समजल्या जाणाऱ्या पत्रकारांचा योग्य तो सन्मान व्हावा यासाठी सोमवारी तालुक्यातील सर्व पत्रकारांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते या तपासणी शिबिरात सहभागी होण्यासाठी डॉ. परितोष गुप्ता यांनी रविवारी च पत्रकारांशी दूरध्वनीवरून संवाद साधत आरोग्य तपासणी करून घ्याणेचे आव्हान केले होते

यावेळी तालुक्यातील अनेक पत्रकारांनी या शिबिरात सहभागी होत आपल्या सहभाग नोंदवला तालुक्यात आजपर्यंत असा अनोखा उपक्रम कोणीही राबवला नसल्याने त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

या आरोग्य तपासणी शिबिरात धकाधकीच्या जीवनात वावरणारे ,कायमस्वरूपी धावपळीत असणारे पत्रकारांची निशुल्क ईसीजी, एक्स-रे, सीबीसी, रक्त ,लघवी ,रक्तदाब आदींच्या तपासण्या करण्यात आल्या. तालुक्यातील नांदगाव – मनमाड व ग्रामीण भागातील जवळपास ६० वर पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली या तपासणीला सर्वसाधारण पणे एका व्यक्तीला दोन हजार रुपये इतका खर्च येतो.अशा सर्व निशुल्क तपासणी करण्यात आल्या.

यावेळी गुप्ता मेडिकेअर हॉस्पिटल चे संचालक डॉ परितोष म्हणाले, की तालुक्यात पत्रकारांचे काम कौतुकास्पद आहे पत्रकारांसाठी मोफत
आरोग्य तपासणी शिबिर घ्यावे असे आम्हास वाटले आजच्या शुभ दिनी हा कार्यक्रम होत आहे यात आम्हास आनंद आहे आम्ही दरवर्षी असा कार्यक्रम घेऊ पुढील वर्षो पत्ररकांची सहपत्नीक आरोग्य तपासणी करणार आहोत, तसेच यावेळी हॉस्पिटलमध्ये आर्थिक परिस्थिती हलखाची असल्यासाठी शासनाची महात्मा फुले जीवन दायी योजना व आयुष्यमान भारत योजना सुरू असल्याची माहिती दिली.

,डॉ परितोष गुप्ता, डॉ हर्षदा गुप्ता, डॉ अशितोष गुप्ता, डॉ. अंकिता गुप्ता, डॉ.प्राजक्ता गुप्ता लॅब सर्जन डॉ मनोज कोरडे तर दवाखान्यातील कर्मचारी अशोक बोरसे, सनी थोरात, सागर खैरे, यासियल घोडेराव, हर्षल गुडेकर यांनी परिश्रम घेतले.यावेळी प्रथम पत्रकारांची तपासण्या करून त्यांना अल्पोहार देण्यात आला. पत्रकारांच्या केलेल्या मोफत आरोग्य तपासणी बद्दल पत्रकारांच्या वतीने भरत पारख यांनी हॉस्पिटल चे संचालक, प्रशासन, डॉक्टर व त्यांच्या टीमचे आभार मानले




