नांदगावला व्ही.जे. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नायलॉन मांजा गोळा करून पूर्ण केली शपथ.

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा
नांदगाव ता.१६ मनुष्यासह प्राणीमात्रांना व पर्यावरणाला घातक ठरणारा नायलॉन मांजा दुसऱ्याच्या जीवाचा फास आहे.पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर केल्याने पशु पक्षांसह,मनुष्यप्राणी यांना गंभीर जखमा झाल्या. पतंग उडविण्याचा स्वानंद इतरांच्या जीवाला धोका ठरणार असेल तर तो मी कधी हि वापरणार नाही.इतरांना त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करेन अशी शपथ व्ही.जे.हायस्कूलचे हरितसेना प्रमुख ए.पी.सोनवणे यांनी ८ मार्च रोजी दिली.
शपथेचा परिणाम असा झाला की,शहर व ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी तीन चार दिवसात,झाडाला अडकलेले पतंग व मोठा मांजा गोळा करून आपल्या शिक्षकांना आणून दिला.तो गोळा करतांना त्यांनी स्वत:ला इजा होऊ नये या सुचनांचे तंतोतंत पालन केले.
दरम्यान गच्चीवर व मैदानात पतंग उडविणाऱ्यांच्या हातात तिळगुळ देऊन ‘गोड गोड बोला,घातक मांजा वापरू नका’असे आवाहन केले. एकीकडे मांजाने जखमी झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असतांना, व्ही. जे. हायस्कूलने दिलेल्या शपथेचे व जागृतीचे समाजात स्वागत होत आहे.
गुरुकृपा कॉलनी, नरेंद्र नगर भागात मध्यमवर्गीय वस्ती असल्याने पतंग उडविणाऱ्यांची संख्या मोठी आहे.तन्मय विजय पाडवी,सक्षम किरण जाधव,यश सुभाष बागुल,अर्णव योगेश फटांगडे,कुशल सुदाम शिंदे, तनिष्का आहेर व इतरांनी मांजा गोळा करून आणला.
झाडावर अडकलेला मांजा खेचण्यासाठी कोणी काठीवर हुक बांधून आकडा बनवला.शाळेत येताना रस्त्यात मित्राच्या पायात अडकला म्हणून तो मांजा आणला.चिंचेच्या झाडावरून,कोणी शाळेच्या आवारातल्या झाडावरून,मांजा गोळा करून शिक्षक सोनवणे यांना दिला.तर काहींनी शपथेचे स्मरण करून मांजा धारकांना तो न वाप्र्न्याचा आग्रह केला.
शाळा समिती अध्यक्ष संजीव धामणे, मुख्याध्यापक लक्ष्मीकांत ठाकरे, उपमुख्याध्यापक खालकर, पर्यवेक्षक मिलिंद कायस्थ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

फोटो ओळ – विद्यार्थी तन्मय पाडवी,सक्षम जाधव,यश बागुल व शिक्षक सोनवणे.



