आपला जिल्हामहाराष्ट्र

बाणगावला जनता विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

गर्जा महाराष्ट्र २४ वृत्तसेवा

बाणगाव बुद्रुक ता.१९ : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती बाणगाव येथील जनता विद्यालयात विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी झाली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष चांगदेव देवकर होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली.यावेळी भुमिका जगताप,ओम निकुंभ,प्रथमेश,देवकर,श्रीहर्ष घोडके ईश्वर गोराडे,स्वप्निल कवडे या विद्यार्थ्यांनी.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भाषणे केली तसेच विद्यालयाच्या विद्यार्थीनींनी शिवचरित्रावर नृत्य सादर केले.यावेळी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट नृत्याविष्काराला प्रमुख पाहुण्यांनी बक्षीसे दिले.यावेळी मविप्र सभासद परशराम कवडे,ज्ञानदेव कवडे,शांताराम कवडे.प्रभाकर कवडे,रविंद्र कवडे,बाळासाहेब पाटील,विकास कवडे,शरद कवडे,रविंद्र कवडे.अशोक घोडके,चिंतामण साबळे,शांताराम जाधव,शालेय समितीचे सदस्य,मविप्रचे सभासद,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिक्षक आर.ए.कवडे यांनी मनोगत व्यक्त केले

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.बी.पवार ,शिक्षक आर.ए.कवडे श्रीमती एस.आर.बोरसे,पी.डी.सिसोदे, आर.ए.चोळके,श्रीमती.व्ही.ए.शिंदे,श्रीमती.व्ही.ए.काळे, एस.ए.बोरसे,जी.बी.आहेर,जी.पी कवडे यांनी नियोजन केले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक शिक्षक आर.ए.चोळके यांनी तर शिक्षिका श्रीमती एस.आर.बोरसे यांनी आभार मानले.

फोटो ओळ

बाणगाव बुद्रुक :-येथील जनता विद्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करताना व्यवस्थापन समिती पदाधिकारी,मुख्याध्यापक,संस्थेचे सभासद व ग्रामस्थ आदी

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.