छत्रपती शिवरायांचे कार्य व योगदान पिढ्यानपिढ्या टिकून राहणार :प्राचार्य डॉ क्लेमेंट नायडू
मनमाड येथील गुड शेफर्ड स्कूल येथे हिदंवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा
मनमाड ता.१९ मनमाड येथील गुड शेफर्ड स्कूल येथे हिदंवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रि प्रायमरी विभागातील कु.स्वराज मढे,विश्वजीत संसारे,रेयांश आव्हाड,ओजस्वी हारदे,शिवांश भाबड,अन्विक शेवाळे,प्रणिती एंळजे, यशमीत दाभाडे,रुत्वा राजपुत,स्वरा खोंड,अरहंत आहीरे या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांची वेषभूषा साकारुन आपले मनोगत व्यक्त केले.तसेच महाराष्ट्राची कला,नृत्य याप्रसंगी सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत गाणे व नृत्याच्या माध्यमातून महाराजाना अभिवादन केले. याप्रसंगी प्राचार्य व शिक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण केला.शाळेची प्रार्थना,राष्ट्रगीत व महाराष्ट्र राज्य गीतानी कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.कु.श्रेया साळवे,स्वस्तिका कोटेचा,अनिरुध्द पाटील,अनुष्का सांबरे,आराध्या सोमासे,सानिका आव्हाड या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले. तसेच कु.सम्यक पगारे याने शिवाजी महाराजांच्या जीवनावर पोवाडा सादर केला.अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ क्लेमेंट नायडू यांनी महाराजांचे कार्य व योगदान पिढ्यानपिढ्या टिकून राहील हे आपल्या भाषणातून सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु.ऋत्विका देवरे ने केले.तर आभार शिक्षक भाऊसाहेब दाभाडे यांनी केले.



