आजच्या तरुणाईने व्यसनापासून दूर राहावे,:- शिव्याख्याते शिवश्री अमोल दरेकर
टाकळी बुद्रुक जनता विद्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा
नांदगाव ता.१९ तालुक्यातील जनता विद्यालय टाकळी बुद्रुक येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक गोरगरिबांचे कैवारी राजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात पार पडली.
याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थिनी आकांक्षा माजगीर हिने माॅं साहेब जिजाऊ ची भूमिका पार पाडली तसेच विद्यालयातील भाविक निकम या विद्यार्थ्याने छत्रपती शिवरायांची वेशभूषा करून सर्व ग्रामस्थांचे लक्ष वेधून घोड्यावर बसून संपूर्ण गावात मोठ्या उत्साहात मिरवणुकीत सहभाग घेतला. त्यानंतर शालेय आवारात मिरवणूक आल्यानंतर विद्यालयाच्या सन्माननीय मुख्याध्यापिका श्रीमती.एम.पी.पाटील यांनी शिवरायांचे पूजन केले.त्यानंतर विद्यार्थिनींनी शिवरायांच्या जीवन प्रसंगावर गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली त्याचप्रमाणे या यावेळी शिवजयंतीचे औंचित्य साधून शिवव्याख्याते विंचूर गावचे भूमिपुत्र शिवश्री अमोल दरेकर यांचे व्याख्यान पार पडले.त्यांनी आजच्या तरुणाईला शिवजयंतीच्या निमित्ताने व्यसनापासून दूर राहा,व्यसन करू नका तसेच पॉझिटिव्ह विचार घेऊन जीवन जगा,हार मानू नका तसेच शेतकऱ्यांच्या जीवनावर प्रकाश झोत टाकण्याचा प्रयत्न श्री दरेकर यांनी उपस्थितांची मने जिंकली याप्रसंगी टाकळी बुद्रुकचे सरपंच संदीप पवार,उपसरपंच सोपान पवार ग्रा.प.चे सदस्य तसेच भाऊसाहेब व विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे श्री.एस.बी,भामरे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्याच्या दृष्टीने विद्यालयाचे शिक्षक व्ही ए.कवडे,आर एम.पवार,पी.सी राजपूत, निकम आर.पी.निकम व एस आर.दैने यांनी परिश्रम घेतले



