आपला जिल्हामहाराष्ट्र

नांदगाव नगरपरिषदेची धडक कर वसुलीची कारवाई

एक मालमत्ता केली जप्त ..

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा

नांदगाव ता.१२ नांदगाव नगरपरिषदेने घरपट्टी / पाणीपट्टी / गाळाभाडे / जागाभाडे या कराच्या वसुलीबाबत धडक मोहीम राबविण्यात येत आहे, या मोहिमे अंतर्गत आज पर्यंत पाणीपट्टी थकबाकी चे एकूण ३० नळ कनेक्शन कट करण्यात आले आहे आणि घरपट्टी थकबाकी पैकी शहरातील सुयोग कॉलोनी परिसरातील एक रो-हाऊस सील करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे,

चालू आर्थिक वर्षात वसुलीचे उद्दिष्ट हे शंभर टक्के असून त्यासाठी पाच वेगवेगळी वसुली पथके तयार करण्यात आली आहे तरी या पथकामार्फत आतापर्यंत जवळपास ४३ टक्के वसुली करण्यात आली आहे व थकबाकीदारांना अंतिम नोटीस सुद्धा वितरित करण्यात आल्या आहेत. नगर परिषदेचा कर न भरल्यास वसुली पथकामार्फत नळ कनेक्शन कट करणे, थकबाकीदारांची नावे प्रसिद्धी करणे, घरासमोर ढोल ताशांचा गजर करणे व अंतिमता मालमत्ता जप्त करणे अशा स्वरूपाशी कारवाई करण्यात येत आहे.कर न भरल्यास दरमहा दोन टक्के दराने शास्ती ही लावण्यात येत आहे.जोपर्यंत कर वसुलीचे उद्दिष्ट साध्य होत नाही तोपर्यंत अशा प्रकारे कारवाई चालूच राहील. अशी सूचना प्रशासक तथा मुख्याधिकारी,श्री श्यामकांत जाधव यांनी दिली आहे.नगरपालिका मुख्याधिकारी श्यामकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली पथकामध्ये प्रशासकीय अधिकारी राहुल कुटे,कर निरीक्षक प्रमोद पवार,स्वच्छता निरीक्षक तुषार लोणारी,रामकृष्ण चोपडे,दिपक वाघमारे,सुनील पवार व इतर कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *