आपला जिल्हामहाराष्ट्र

“नांदगाव रत्न” पुरस्काराने सौ. अंजुमताई सुहास कांदे सन्मानित

महिला सक्षमीकरण,सामाजिक व सांस्कृतिक कार्याची दखल

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा

नांदगाव ता. 21 – शिक्षक नेते स्व. अण्णासाहेब गंगाधर शिवराम आहेर प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्या. नांदगाव यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा “नांदगाव रत्न” पुरस्कार यंदा सौ.अंजुमताई सुहास कांदे यांना प्रदान करण्यात आला.महिला सक्षमीकरण,सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता

संस्थेच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव,शिक्षक सन्मान व “नांदगाव रत्न” पुरस्कार वितरण सोहळा कृष्णाई मंगल कार्यालय,हनुमान नगर,नांदगाव येथे मोठ्या उत्साहात आणि उत्सवमूढ वातावरणात पार पडला.कार्यक्रमाचे
प्रमुख अतिथी नांदगाव विधानसभा मतदार संघांचे आमदार सुहास आण्णा कांदे समृद्धी सहकारी बॅंकेच्या चेअरमन सौ.अंजुमताई सुहास कांदे
युवा सेना जिल्हाप्रमुख फरान खान पंचायत समिती मा सभापती विलासभाऊ आहेर, जिल्हा मजूर फेडरेशन चे चेअरमन प्रमोद भाबड, तालुका युवा सेनेचे अध्यक्ष सागर हिरे गटशिक्षण अधिकारी प्रमोद चिंचोले होते यावेळी संस्थेचे चेअरमन श्रीमती.शीलाताई देसले,व्हा चेअरमन भाऊसाहेब मवाळ संचालक मंडळ राजेंद्र पाटील,संजय शेवाळे,धोंडीराम पठाडे,रविंद्र बोरसे,अनिल बोरसे,परशराम शेळके,कांतीलाल जाधव,शरद पवार,प्रकल्प पाटील,प्रविण ठाकरे,श्रीमती.चारुलता पाटील,राजेंद्र काटकर,शिवाजी काजीकर,बाबुलाल ठोंबरे तसेच नामवंत मान्यवर उपस्थित होते.या वेळी सौ.अंजुमताई कांदे यांना “नांदगाव रत्न” पुरस्कार देण्यात आला.


पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना सौ.अंजुमताई कांदे म्हणाल्या,”संस्थेने जो सन्मान दिला आहे,तो माझ्यासाठी प्रेरणादायी आहे.समाजात महिलांना सक्षम करण्यासाठी,संस्कृती आणि समाजसेवेच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा आणि परिवर्तन घडवण्याचा जो माझा प्रयत्न आहे,त्याला या पुरस्कारामुळे नवे बळ मिळाले आहे.संस्थेने जो विश्वास दाखवला आहे,त्याला मी पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करेन.”
या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्यास नवा गौरव प्राप्त झाला असून, सामाजिक क्षेत्रातील इतर कार्यकर्त्यांनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास अनेक मान्यवरांनी व्यक्त केला.कार्यक्रमचे सुत्रसंचालन आणि आयोजन अत्यंत प्रभावीपणे पार पडले.या प्रसंगी विविध मान्यवरांनी संस्थेच्या कार्यप्रणालीचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.