ताज्या घडामोडी

राज्यात सुरक्षित क्षेत्रात चार लाख विहिरी शक्य

मनरेगांतर्गत नाशिक जिल्ह्यात साडे आकारशे गावात विहिरींना मिळाली मंजुरी

बाबासाहेब कदम
बाणगाव बुद्रुक ता.०९ भूजलाच्या सर्वेक्षणानुसार राज्यात अजून ३ लाख ८७,५०० विहीरी खोदणे शक्य होणार आहे.मनरेगाअंतर्गत विहिरी चा लाभ घेत राज्यातील बळीराजाचे बागायतदार होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे

भूजल विभागाच्या केलेल्या सर्वेक्षण नुसार राज्यात केवळ सुरक्षित वर्गवारीतील पाणलोट क्षेत्रातच सिंचन विहिरींना परवानगी दिली जाते. राज्यातील काही भागात विहीर,खोदून जमिनीची अक्षरशः चाळन झाली आहे.पाणी पातळी खोल गेल्याने विहीर खोदून ही पाणी लागतो पर्याने खर्च वाया जातो यामुळे आपल्या भागातील भूजल पातळी चा अभ्यास करूनच घेणे आवश्यक आहे अन्यथा खर्च वाया जातो मनरेगा अंतर्गत विहीर चा लाभ घेण्यासाठी भूजल सर्वेक्षण अहवाल महत्वाचा भाग आहे.
महाराष्ट्र भुजल (पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन) अधिनियम १९९३ च्या कलम ३ नुसार अस्तित्वातील पेयजल खोताच्या ५०० मीटर परिसरात नवीन विहिर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत.त्यामुळे अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या ५०० मीटर परिसरात सिंचन विहिर अनुज्ञेय करु नये,व तसेच दोन सिंचन विहिरींमधील १५० मीटर अंतराची अट पुढील बाबींना लागू राहणार नाही.1. दोन सिंचन विहिरीमधील किमान १५० मीटर अंतराची अट ही Run off झोन तसेच,अनुसूचित जाती व जमाती व दारिद्रय रेषेखालील कुटुंब यांकरिता लागू करण्यात येऊ नये.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिर मंजूर करताना खाजगी विहिरीपासून १५० मी.अंतराची अट लागू राहणार नाही.

*******

नाशिक जिल्ह्यात ११४६ गावांमध्ये विहीर खोदण्यास मंजुरी
नांदगाव तालुक्यात १०० गावांपैकी ७२ गावात वैयक्तिक विहीर व १९ गावात सामुदायिक विहीर खोदता येईल ९ गावात विहीर खोदण्यास परवानगी नाही

नाशिक जिल्ह्यात क्षेत्र वर्गीकरण….
आतिशोषित क्षेत्र १३
शोषित क्षेत्र ०३
अंशतः शोषित क्षेत्र १८
सुरक्षित क्षेत्र ४६
*******
भूजल सर्वेक्षण अहवालानुसार नांदगाव तालुक्यात ७२ गावात वैयक्तिक व १९ गावात सामुदायिक विहिरी खोदण्यास परवानगी आहे या सर्वेक्षणात गावे वाढल्याने मनरेगा अंतर्गत विहीरचा लाभ घेऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे
एस.डी.गोसावी कृषी अधिकारी पँ.स नांदगाव
********
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधार देणारी लोकप्रिय योजना मनरेगा असून,या योजनेंतर्गत मी तीन वर्षांपासून विहीर मागणी प्रस्ताव पंचायत समिती कडे सादर केला होता.भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेनेच्या सर्वेक्षणात आमचे गाव सेमी क्रेटिकल मध्ये आल्याने आम्हाला वैयक्तिक स्वरूपाची विहिरीचा लाभापासून वंचीत राहावे लागले.या नवीन सर्वेक्षण नुसार आमचे गाव सेफ झोन मध्ये आल्याने आम्हाला मनरेगा लाभ मिळणार आहे.आमचे बागायतदार होणेचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

किशोर देवकर – मनरेगा विहिरीचा वंचीत लाभार्थी बाणगाव बुद्रुक

फोटो ओळ :-प्रतिक्रिया
१) एस.डी.गोसावी कृषी अधिकारी
२) किशोर देवकर विहिरी प्रतीक्षा लाभार्थी बाणगाव

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.