महाराष्ट्र
Trending

मनरेंगा योजनेत जाचक अटींमुळे राज्यात रोजगार हमी योजनेतील कामे ठप्प .

गर्जा महाराष्ट्र24न्यूज वृत्तसेवा
बाबासाहेब कदम
नाशिक ता.२३ केंद्र सरकारने देशात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांवर काम करणाऱ्या मजूरांची उपस्थिती नोंदविण्यासाठी १ जानेवारी पासून ग्रामरोजगार सेवकामार्फत मोबाईल द्वारे एन.एम.एम.एस.या प्रणालीचा वापर करून दिवसातून दोन वेळा (सकाळी ६ ते ११ या वेळात व दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत) फोटो घेणे बंधनकारक केले आहे.या दोन वेळेस फोटो अपलोड झाले तरच काम करत असलेल्या मुजरांची हजेरी लागून मजुरी मिळणार आहे फोटो अपलोड झाला नाहीतर काम करून ही गैरहजर लागणार आहे तसेच NMMS प्रणाली राबविताना विविध समस्या निर्माण झाली आहे त्यात ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीच्या ग्रामरोजगार सेवकांना मोबाईल देण्यात आलेला नाही.ज्या ग्रामरोजगार सेवकाकडे मोबाईल आहे.त्याच्या मोबाईलला ग्रामीण भागात नेट राहत नसल्यामुळे ग्रामीण भागात हे अँप चालत नाही.मोबाईल अँपवर फोटो घेता येत नाहीत.काही वेळेस मजूर दुपारच्या सत्रात कामाला येतात पण सकाळी मजूर नसल्याने सकाळी फोटो घेतला जात नाही त्यामूळे दुपारच्या सत्रात मजूर कामावर असले तरी फोटो घेता येत नाही मोबाईल अँपवर मजुरांचा फोटो दिवसांतून दोन वेळा आला असेल तरच त्या मजुराला दिवसाची मजुरी मिळणार आहे.अशी जाचक अट या आदेशात असल्यामुळे राज्यभरात वेगवेगळ्या यंत्रणेमार्फत सुरू असलेली मग्रारोहयोची सर्व कामे आता बंद पडली आहेत. ही कामे बंद पडल्यामुळे मजुरांची उपासमार सुरू झाली आहे.

प्रतिक्रिया…..

रोजगार हमीच्या कामावरील मजुरांचे एन.एम.एम.एस.प्रणालीद्वारे दिवसांतून दोन वेळा छायाचित्रांसह कार्यस्थळावरील मजुरांची उपस्थिती घेणे बंधनकारक केले आहे ही सक्ती का केली जाते सरकारी कार्यालयात कर्मचारी सुध्दा दोनवेळा हजेरी घेतली जात नाही मंग मजुरांना का वेगळा न्याय का? हे ऍप चालत नाही फोटो अपलोड होत नाही यामुळे मजूर कामावर असताना ही त्यांची हजेरी लागत नाही परिणामी त्यांना मजुरी मिळत नाही याची जबाबदारी कोणी घ्यायची ही जाचक अट तात्काळ मागे घ्यावी.व पूर्वीप्रमाणे ऑफलाइन हजेरी घ्यावीत अन्यथा मग्रारोहयोच्या कामांना कायमची खीळ बसणार आहे.
विलास गायकवाड संचालक भौरी विका सोसायटी
********

एन.एम.एम.एस.या अँपद्वारे रोहयो च्या कामावरील ऑनलाइन हजेरी घेण्यासाठी रोजगार सेवकांना पूर्ण वेळ काम करावे लागणार आहे शासन निर्णय प्रमाणे रोजगार सेवकांच्या सेवा अर्धवेळ आहे त्यामुळे त्यांना अल्प मानधन मिळते तेही सहा महिन्यांनी मिळते हे काम करण्यास रोजगार सेवक तयार आहे शासनाने रोजगार सेवकांना पूर्णवेळ कर्मचारी चा दर्जा देऊन दरमहा फिक्स मानधन द्यावे.

कॉ राजू देसले -राज्यध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटना आयटक

मनरेगा कामावर काम करणाऱ्या मजूराँची ऑनलाइन NMMS पध्द्तीने हजेरी घेताना येणार Err

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.