आपला जिल्हा
Trending

बचतगटांच्या महिलांसाठी बँकेची स्थापना करणार : समाजसेविका अंजुमताई कांदे;

नांदगाव ला विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान

गर्जामहाराष्ट्र24न्यूज वृत्तसेवा

नांदगाव,ता.२२ शहर व तालुक्यातील महिलांच्या बचत गटांसाठी लवकरच महिला बैंक सुरु करण्याचा संकल्प समाजसेविका अंजुमताई सुहास कांदे यांनी व्यक्त केला.
पालिकेच्या महिला व बालकल्याण विभागातंर्गत स्वच्छ भारत अभियान माझी वसुंधरा व लोकशाही पंधरवाडा इत्यादी शासनाच्या विविध अभियानाच्या माध्यमातून विद्याथ्र्यांसाठी व बचत गटातील महिलांसाठी चित्रकला,रांगोळी, वक्तृत्व, निबंध व संगीत खुर्ची इत्यादी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेतील विजेत्या
स्पर्धकांना समाजसेविका अंजुमताई कांदे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी त्या बोलत होत्या.
मुख्याधिकारी विवेक धांडे अध्यक्षस्थानी होते.याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजीव धामणे,शिवसेना महिला आघाडीच्या रोहिणी मोरे,मुख्याध्यापक श्री.बडगुजर,प्रशासकीय अधिकारी मुक्ता कांदे,कर निरीक्षक राहुल कुटे,शिक्षण मंडळाचे लिपिक अनिल पाटील,विजया धनवट उपस्थित होते.श्रीमती.कांदे म्हणाल्या,की महिलांच्या बचत गटांसाठी चाळीसहून अधिकचे नवेउद्योग व त्या उद्योग व्यवसायांचे प्रशिक्षण लवकरच सुरु करण्याचा आपला प्रयत्न आहे.पालिकेच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग या उपक्रमांतर्गत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानतंर्गत गंगेश्वर महिला बचत गट व सिद्धेश महिला बचत गट यांना प्रत्येकी चार लाख रुपये अर्थसाह्याचा धनादेश अंजुमताई कांदे यांच्या हस्ते वितरित
करण्यात आला.सूत्रसंचालन सहायक प्रकल्प अधिकारी आनंद महिरे यांनी केले. तर आभार मुख्याध्यापक शहीद शेख यांनी मानले.
********
या बनल्या स्वच्छता दूत

■ राजश्री बेलदार (अध्यक्ष,स्त्रीशक्ती शहर संघ),शबाना मन्सुरी (सचिव, स्त्रीशक्ती शहर संघ),अलका गायकवाड (अध्यक्ष, एकविरा वस्ती संघ),रत्ना वाबळे (सदस्य,नीलांबरी वस्ती स्तर संघ), कोमल भालेकर (सदस्य,ज्ञानज्योती वस्ती स्तर संघ), बेबीनंदा मोरे (निर्मिती वस्ती स्तर संघ) यांची माझी वसुंधरा ३.० व स्वच्छ भारत अभियान २०२३ अंतर्गत शहराचे ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा श्री.विवेक धांडे यानी केले

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.