ताज्या घडामोडी

… अबब मोटार सायकल मध्ये कोब्रा साप

नशीब बलवत्तर अंगावर कोब्रा सर्प चढला पण...

गर्जा महाराष्ट्र24न्यूज वृत्तसेवा
बाबासाहेब कदम
नांदगाव ता.२३ आज च्या घडीला काय घडेल काही सांगता येत नाही ! नशीब बलवान असेल तर काही होऊ शकत नाही असे म्हणतात याचे प्रत्यक्ष उदाहरण नांदगाव शहरात मध्ये पहावयास मिळाले
सविस्तर वृत्त असे की मूळडोंगरी येथील युवक गणेश गोरे हा युवक नादगावं येथे कारखान्यात कामाला येतो नेहमी प्रमाणे सायंकाळी सुट्टी झाल्यावर आपल्या मित्रा सोबत मोटार सायकल ने घरी जात होता मोटार सायकल मित्र चालवीत होता तर गणेश पाठीमागे बसला होतो ते नांदगव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट जवळ येत असताना गाडी चालू स्थितीत कोब्रा जातीचा सर्प त्याच्या पाठीमागे खांद्यावर आला गणेश काही तरी जाणवले बघतो तो काय ! सर्प गणेश ने चालू गाडीत खाली उडी घेतली तर वाहन चालक मित्राने गाडी सोडून दिली हिंमत करून गाडी जवळ येऊन पाहिले तर सर्प गाडीच्या टूल बॉक्स मध्ये दडवून बसला होता उपस्थितानी सर्प मित्र विजय बडोदे यांना दूरध्वनी द्वारे संपर्क करत माहिती दिली सर्प मित्र विजय बडोदे हे त्वरित हजर झाले व त्यांनी कोब्रा जातीच्या सर्पास पकडून घेतले

म्हणतात ना नशीब बलवत्तर असेल तर काही होत नाही गणेश च्या पाठवर कोब्रा जातीचा सर्प येऊन सुद्धा सर्पणे डँश केला नाही नाहीतर काही ही होऊ शकले असते

प्रतिक्रिया.….
आपली गाडी उभी करतानाची जागा व्यवस्थित चेक करा आपण गारव्यात झाड खाली उभी करतो गाडी काढताना चेक करा की गाडीत काही लपलेले नाहीना याची खात्री करा
विजय बडोदे – सर्प मित्र नांदगाव

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.