आरोग्य व शिक्षण

नांदगावला लिटल स्टार इंग्लिश मिडीयम स्कुल व रेंबो इंटरनॅशनल स्कुल मध्ये दहावे वार्षिक स्नेहसंमेलनात उत्स्फूर्तपणे साजरा

चिमुकल्यांनी सादर केले विविध नृत्यविष्कर

गर्जा महाराष्ट्र24न्यूज :वृत्तसेवा
नांदगाव ता.२४ येथील लिटल स्टार इंग्लिश मिडीयम स्कुल व रेंबो इंटरनॅशनल स्कुल मध्ये दहावे वार्षिक स्नेहसंमेलनात उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला यात देवा तुझ्या दारी आलो गुंन गाया मोरया!मोरया,! माऊली- माऊली,विसरू नको रे आई बापाला !इडा पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे,नको जाऊ सोडुनी…. आशा विविध गाण्यावर नृत्याविष्कार सादर करीत उपस्थितांचे मनोरंजन करीत उपस्थितांची दाद मिळवली.तीन दिवसीय चलेल्या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन प्रमुख अतिथी समाजसेविका अंजुमताई कांदे,डी.एस.जानराव मंत्रालय मुंबई अमित पटेल श्री. पाठक तसेच  नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल, उपाध्यक्ष सरिता बागुल लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मुख्याध्यापिका अनुराधा खांडेकर,रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सूर्यवंशी यांनी केले.स्कुलच्या सप्ताह,मध्ये माता पालक स्पर्धा,चिमुकल्यांच्या विविध क्रीडा स्पर्धा,फेन्सी ड्रेस स्पर्धा,सोलो डान्स, ग्रुप डान्स च्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये प्राविण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदक,स्मुर्ति चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे समाजसेेेविका अंजुमताई कांदे यांनी मनोगत व्यक्त केले त्या म्हणाले कि अभ्यास व पुस्तकी न्यानाबरोबर विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे व त्यांचा सर्वांगीण विकास साधने महत्वाचे असते म्हणून स्कुल मध्ये असे कार्यक्रम प्रेरक ठरतात असे 

प्रतिपादन समाजसेविका अंजुुुमताई कांदे यांनी केले व स्कुलाच्या कार्यक्रमा बद्दल कोतुक करीत स्कुलला शुभेच्छा दिल्या या वेळी मुख्याध्यापिका अनुराधा खांडेकर यांनी दर्जेदार शिक्षण व संस्थेच्या उपक्रमाबद्दल माहिती विशद केली वेळी संस्थेचे संस्थापक संजय बागुल व उपाध्यक्षा सरिता बागुल यांनी विशेष मार्गदर्शन केले . यावेळी स्कूलच्या शिक्षिका वर्षा नगे व शिक्षक संदीप पांडे यांना २०२१- २२ या वर्षाचे आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.व रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षिक मोनाली  गायकवाड यांना २०२१-२२ आदर्श शिक्षक पुरस्कारने सन्मानित करण्यात आले व त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल व उपाध्यक्षा  सरिता बागुल यांनी सर्व शिक्षकांना उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक म्हणून सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले.हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पाडण्यासाठी लिटील स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षिका अर्चना इंगोले अंकिता सरोदे भाग्यश्री शिंदे धनश्री न्याहारकर पूनम सोमासे विजेता पिलके सुरेखा गायकवाड नेहा पाटील,संदीप पांडे,राहुल उपाध्याय मोहन सुरसे अनिता जगधने,क्रिडा शिक्षक मयुरी क्षिरसागर तसेच रेंनबो इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षिका एडना फर्नांडिस मोनाली गायकवाड जयश्री चौधरी चैताली अहिरे रोहिणी पांडे अश्विनी केदारे,दिव्या शिंदे ‌तसेच मदतनीस श्रीमती अनिता नेमणार,वैशाली बागुल,छाया आवारे,ज्योती सोनवणे,मंजुषा जगधने,मंगेश शिंदे,विनोद चौधरी,गजानन पवार,सागर कदम,बाळू गायकवाड,नासिर खान पठाण,चंदू बागुल,रवि पटाईत यांनी मेहनत घेत यशस्वीपणे पार पडला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार शाळेच्या शिक्षिका वर्षा नगे व अनिता जगधने यांनी केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.