ताज्या घडामोडी

 जुन्या पेन्शन सह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांरी 14 मार्च ला जाणार संपावर

 राज्य सरकारी कर्मचाऱ्यानी जिल्हाधिकारिंना दिले संपाचे निवेदन

गर्जा महाराष्ट्र24 न्यूज
नाशिक ता.२५ सरकारी,निमसरकारी नगरपालीका नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी समितीने जुन्या पेन्शन योजनेसह कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी १४ मार्चला राज्यव्यापी बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.
त्याबाबतचे निवेदन शनिवारी ता२५ रोजी नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरण डी.यांना कर्मचारी संघटनेतर्फे देण्यात आले. यात राज्यातील सरकारी,निमसरकारी,शिक्षक,शिक्षा, महापालीका नगरपालीका नगरपरिषद,पंचायत कर्मचारी अशा विविध आहेत संघटनांच्या मार्फत शासनाकडे प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात आले.सतत प्रयत्न करुनही शासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचा संघटनांचा आरोप आहे. सरकारी निमसरकारी, शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांनी आज जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांना निवेदन दिले.राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष दिनेश वाघ,सरचिटणीस सुनंदा जरांडे,ए.के.वाबळे,संजय जाधव,लता परदेशी,तुषार नागरे, दुर्गेश कुलकर्णी,जीवण आहेर,राजेंद्र पाबळे,एम.एन.पिंगळे, जिजा गवळी,भास्कर भामरे,एस.एम.पिंगळे,अरुण तांबे,सागर नागरे, उमाकांत ढाले,प्रशांत खालकर,संभाजी आगलावे आदीच्या नेतृत्वाखाली आज विविध संघटनांच्या प्रतिनिधीनी निवेदन दिले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.