ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अंगणवाडी सेविकांचा बेमुदत संप

नांदगावच्या अंगणवाडीसेविका संपात सहभागी

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज
नांदगाव, ता.२५ : अंगणवाडीसेविका यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा,सद्यःस्थितीत मिळालेले निकृष्ट दर्जाचे मोबाईल बदलून मिळावेत.मानधनात भरघोस वाढ मिळावी,मासिक पेन्शन योजना सुरु करावी,पोषण आहार दरात वाढ करावी आदी महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांनी बुधवार (ता. २२) पासून पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपात तालुक्यातील सर्व अंगणवाडीच्या सेविका मिनी सेविका व कार्यरत मदतनीस सहभागी झाल्या.अंगणवाडी सेविका संपात सहभागी झाल्याने नियमित कामकाजावर याचा परिणाम झाला.१८१ नियमित सेविका, २९ मिनी सेविका,तर कार्यरत १३८ मदतनीस या संपात सहभागी झाले. पोलिओ निर्मूलन सह कोरोना काळात अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा बजावलेल्या अंगणवाडी सेविकांचा राज्य शासनाने फक्त उपयोग करून घेतला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.