महाराष्ट्र

२७ फेब्रुवारी पासून राज्यभरातील ग्रामपंचायत संगणकपरिचालकांचे बेमुदत कामबंद आंदोलन

नादगावं तालुका संगणक परिचालक संघटनेचे आमदार सुहासआण्णा कांदेना मागण्याचे निवेदन

गर्जा महाराष्ट्र24न्यूज

नांदगाव प्रतिनिधी ता २५: गेल्या ११ वर्षांपासून ग्रामपंचायती मध्ये अल्प मानधनावर प्रामाणिक काम करतअसलेल्या संगणकपरिचालकांना सुधारित आकृतीबंधानुसार ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याची मागणीसाठी महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक राज्य संघटनेच्या वतीने २७ फेब्रुवारी पासून राज्यातील सर्व संगणकपरिचालक कामबंद ठेऊन बेमुदत संप करणार असून १ मार्च २०२३ रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिली आहे.
ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागा अंतर्गत “आपले सरकार” प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर संगणकपरिचालक कार्यरत असलेल्या,संग्राम व आपले सरकार या दोन प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर राज्यातील संगणकपरिचालक प्रामाणिकपणे काम करत आहेत.परंतु शासनाने संगणकपरिचालकाना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतन देण्याच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.आपले सरकार प्रकल्पात काम करणाऱ्या संगणकपरिचालकांवर नेहमी अन्याय करण्यात आलेला असून ग्रामविकास विभागाने १४ जानेवारी २०२१ रोजी च्या शासन निर्णयात घेतलेल्या निर्णयानुसार अगोदर असलेल्या तुटपुंज्या ६००० रूपये मानधनात १००० रुपये वाढ केली.आज महागाईच्या काळात ७००० रूपयाच्या मासिक मानधनात संगणकपरिचालकानी स्वतःचा व कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा कसा हा प्रश्न असताना सरकार संगणक परिचालकांना वारंवार आश्वासन देऊन सुद्धा निर्णय होताना दिसत नाही, नागपुर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशना दरम्यान संघटनेच्या वतीने २७ व २८ डिसेंबर रोजी मोर्चा काडून शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते,त्याची दखल घेत राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीशजी महाजन यांनी संघटनेला लेखी आश्वासन दिले होते,त्यानुसार ११ जानेवारी २०२३ रोजी मा.ग्रामविकासमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संघटनेच्या मागणीनुसार शासनाने नेमलेल्या यावलकर समितीच्या शिफारशीनुसार संगणकपरिचालकांना सुधारित आकृतीबंधात ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला व सदरची फाईल वित्त विभागास पाठवण्याचा निर्णय बैठकीत झाला,सध्या ग्रामविकास विभागाने वित्त विभागास सुधारित आकृतीबंधाची फाईल पाठवली आहे,परंतु त्यावर निर्णय होऊन निधीची तरतूद शासनाने अर्थसंकल्पातून करावी या प्रमुख मागणीसाठी २७ फेब्रुवारी २०२३ पासून ग्रामपंचायत स्तरावर संगणकपरिचालकांना असलेली सर्व कामे बंद ठेऊन बेमुदत संप करण्यात येणार असून ०१ मार्च २०२३ रोजी राज्यातील संगणकपरिचालक हजारोंच्या संख्येने मुंबई येथील धरणे आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती व नांदगाव तालुका पूर्ण तकदी निशी मोर्चाला उपस्थी राहील असे सांगिते आणि नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहासआण्णा कांदे व नांदगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना कामबंद व धरणे आंदोलनाचे निवेदन देण्यात आले यावेळी नांदगाव तालुका अध्यक्ष सोमनाथ उरकुडे तालुकासचिव श्रीकांत (नाना) जगताप तालुका उपाध्यक्ष अरुण जाधव व इतर सदस्य उपस्थित होते व मुंबई येथील धरणे आंदोलनात सहभागी मोठ्या संख्येने उपस्थिती राहण्याचे संघटनेचे नांदगाव तालुकासचिव श्रीकांत (नाना)जगताप यांनी केले आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.