कृषी व व्यापार

नादगावं तालुक्यात धरणे असूनही पाच टक्क्यांएवढेही सिंचन क्षेत्र नाही सिंचन क्षमतेत वाढीसाठी हवे कालबद्ध नियोजन

सिंचन क्षमतेत वाढीसाठी हवे कालबद्ध नियोजन

गर्जा महाराष्ट्र२४न्यूज
नांदगाव,ता.२५अवर्षणग्रस्ततेचाशाप माथ।असलेल्या नांदगाव तालुक्यातील पिण्याच्या पाण्याच्या सहाशे कोटी पेक्षा अधिक रुपयांच्याविविध योजनांना मुहूर्त लाभल्याने आता जनतेचे विशेषतःतालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष सिंचनविषयक प्रकल्पाकडे लागले आहे.सध्या मध्यम व इतर लघू अथवा अन्य लहान मोठे बंधारे मिळून सात हजार हेकटरसिंचनहोणे अपेक्षित असताना दुर्दैवाने प्रत्यक्षात ते झालेले नसल्याची विरोधाभासाची विदारकता सध्याच्या प्रकल्पाची आहे तालुक्यात गिरणा, माणिकपुंज नाग्या- साक्या यासारखी धरणे असूनहीपाच टक्क्याएवढे ही सिंचनहोत नाही ही वस्तुस्थिती आहे. मध्यम प्रकल्प व लघुप्रकल्पाच्या माध्यमातून नांदगाव तालुक्यातील केवळ दीड टीएमसी पाण्याची साठवण क्षमता आहे. त्यातूनच पिण्याच्या पाण्यासहसिंचनाची गरज भागविली जाते. त्यामुळे हव्या त्या क्षमेतेनेसिंचनहोत नाही.तालुक्यातील मध्यम आणि लघू प्रकल्पाची साठवण क्षमता अवघी दीड टीएमसी आहे. यात सुमारे नव्याने दोन टीएमसीने वाढ होणे गरजेचे आहे. या सिंचन क्षमतेत वाढ करण्यासाठी नार-पारचा आधार असला तरी त्याच्या प्रकल्पीय अहवालात समावेश झाला पाहिजे. अशी मागणी पुढे आली असली तरी तालुक्याची पाण्याची प्रत्यक्षात पाण्याची गरज व उपलब्ध पाणी याचा मेळ कधीच बसू शकलेल राज्याच्या जलसंपदा विभागाच्या नव्या पद्धतीने सिंचन मागणीचा व्यय अग्रक्रम समितीकडे वर्षानुवर्षे रेटा पुढे न्यायला हवा त्यासाठी प्रलंबित पडून राहिलेलेप्रस्तावांचे कालबद्ध नियोजनाची गरज आहे. काय झाले याचा विचार करून धरणे होत असताना गृहीत धरण्यात आलेले सिंचनक्षेत्र जैसे थे त्या स्थितीत राहून गेल्याचे दिसून येते. दुसरीकडे धरणाच्या लाभक्षेत्रात ओलिताखाली येणारे क्षेत्रात वाढ होणे दूरच.मात्र मागील दरवाजाने लगतच्यातालुक्यातील सिंचनक्षेत्रात जवळपास दुप्पटीने वाढ झाल्याचे देखील दिसून आले आहे.तालुक्यात मोठे प्रकल्प जेव्हा म्हणून होतील तेव्हा.परंतु आहे त्या नियोजित प्रकल्पातून नांदगावचा हक्क प्रस्थापित झाला पाहिजे.

दुरष्टीक्षेप ####
तालुक्यातील प्रकल्पनिहाय सिंचन क्षेत्र (हेक्टरमध्ये )
माणिकपुंज २६५.८५,नाग्यासाक्या २४००,गुळमोडी २२०, चांदेश्वरी १८०, लोहशिंगवे ५१२,भालुर- २१०,मांडवडवाडी १९०, रणखेडा १३५, पोखरी ३९६,धनेर १८

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.