ताज्या घडामोडी
Trending

कांदा हमीभावासाठी महाविकास आघाडीतर्फे रस्ता रोको!

केंद्र व राज्य शासनाच्या धोरणाचा निषेध; दोन तास वाहतूक ठप्प

गर्जा महाराष्ट्र24 न्यूज वृत्तसेवा
नांदगाव ता.०१ कांद्याचे भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वर आर्थिक संकट ओढवल्याने सध्या सुरु असलेल्या विधिमंडळाच्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मतदार संघातील शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवावा असे आवाहन तालुक्यातील पाचही माजी आमदार यांनी विद्यमान आमदार सुहास कांदे यांना केले.
शेतकऱ्यांच्या कापूस व कांद्याला योग्य बाजार भाव  मिळावा या मागणीसाठी सोमवारी (ता.२७) मागणीसाठी सोमवारी येथील बाजार समितीच्या प्रवेशद्वारापुढे मतदार संघातील माजी आमदार पंकज भुजबळ,ऑड.जगन्नाथ धात्रक,अॅड.अनिल आहेर, राजाभाऊ देशमुख,संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले.या आंदोलनामुळे येवला रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळित झाली होती तर लिलावाच्या कामकाजावर परिणाम झाला.
.केंद्र सरकार व राज्यातील सरकार शेतकऱ्यांची कशी हेळसांड करीत असून दररोज कोसळणाऱ्या बाजार भावामुळे तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे.आम्ही देखील सत्तारूढ गटाचे आमदार असताना देखील विधिमंडळात स्वतःच्या सरकारविरोधात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवीत सभागृहाला निर्णय घेण्यास भाग पाडल्याची आठवण माजी आमदार अॅड.आहेर यांनी करून दिली.शरद पवार केंद्रात कृषिमंत्री असताना नांदगावहून दिल्लीला गेल्यावर शेतकऱ्यांच्या निर्यात धोरणावर कसा निर्णय घेतला याची आठवण माजी आमदार पंकज भुजबळ यांनी करून दिली. माजी आमदार संजय पवार यांनी आमच्या माजी आमदारांच्या संघटनेत पुढील वर्षी अजून एक सभासद वाढणार असल्याच्या मिशक्ल शब्दात खिल्ली उडविली.
नायब तहसीलदार चेतन कोणकर यांनी मोर्चेकरी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.काँग्रेस तालुकाध्यक्ष हरेश्वर सुर्वे,शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संतोष गुप्ता यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी विनोद शेलार,माजी नगराध्यक्ष अरुण पाटील, लसंतोष बळीद,राजेश सावंत,वाल्मीक टिळेकर,राजू लाठे,दादा पगार,बाळासाहेब देहाडराय,राजाभाऊ आहेर,योगिता पाटील,सीमा राजुळे,अलका आयनोर,मनोज चोपडे,उदय पाटील,उदय पवार,शिवाजी बच्छव,योगेश कदम,रामदास पाटील,प्रवीण घोटेकर आदींसह घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी तर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांनी आभार.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.