ताज्या घडामोडी
Trending

शहरालगत राहूनही पाण्यासाठी पायपीट

नांदगावच्या कोरड्या शाकांबरी नदीपात्रातील झऱ्याचा आधार

गर्जा महाराष्ट्र24न्यूज

नांदगाव, ता.२६ उन्हाळ्याची चाहूल लागली असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरालगत असलेल्या आदिवासी वस्तीवर राहणान्या महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे.पिण्याच्या पाण्यासाठी या महिला थेट कोरड्या पडलेल्या शाकांबरी नदीच्या पात्रात असलेला एकमेव पाण्याचा झरातून पाणी आला आहे.मिळवीत आपली तहान भागवीत आहे.
शहरालगत असलेल्या इदगाह मैदानामागे आदिवासी बांधवांची योग्य व्यवस्था नसल्याने या महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावे लागते.दरवर्षी उन्हाळ्यात तर या महिलांना दूरवरून पाणी आणावे लागते.सध्या तर उन्हाळ्याची चाहूल लागल्यापासून सकाळ झाली की प्लॅस्टिकचे डबे हातात घेत वस्तीवरच्या महिला वस्तीपासूनच्या हाकेच्या अंतरावर झन्याकडे धाव घेतात. शाखांबरीच्या कोरड्या पात्रात अगोदरच्या वाळू उपसल्यामुळेपाण्याचा शोध घेणे अवघडच त्यात उपसा झालेल्या ठिकाणी साचलेल्या पाण्याच्या डबक्याजवळकाही अंतर राखून पिण्याच्या पाण्याचा शोधण्यात या महिला पाणी भरतात.एक डबा भरण्यासाठी अर्धा पाउन तास लागतो तेवढा उपसा झाला कि झऱ्यातील पाणीही आटले की नव्याने झिरपा येई पावेतो कळ काढत थांबायचे पाणी साचले की पुन्हा भरायचे असा दिनक्रम या आदिवासी महिलांच्या वाटेला आला आहे.जर हे पाणी पूर्णपणे आटले तर सर्व जण पैसे जमवून पाण्याचा टैंकर मागवून आपली तहान भागवीत आहे.पूर्वी इदगाह मैदान जवळ एक हातपंप होता.त्याला पाणी होते तेथून पाणी मिळत असे.मात्र हातपंप नादुरुस्त झाल्याने कोरड्या नदोकडे धाव घेत पाण्याचा शोध घ्यावा लागत असल्याचे चित्र आता पुन्हा दिसू लागले आहे.अख्खा दिवस पाण्याचा पाठलाग करत निघून जातो आणि जेमतेम दोन हंडे पाणी पदरात पडावं अशी परिस्थिती सध्या तरी त्यांच्यावर ओढवली आहे.

कागदपत्रे नसल्याने लाभापासून वंचित
• इदगाह मैदानाबाहेर राहणाऱ्या या आदिवासी बांधव मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहे.
■ त्यामुळे त्यांच्याकडे शिधापत्रिका,आधारकार्ड नसल्याने त्यांना त्यामुळे शासकीय लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.