ताज्या घडामोडी

घाटमाथ्यावरील गारपीटग्रस्त भागातील पिकांची आमदार सुहास कांदे यांनी केली पाहणी

मदतीचे शेतकऱ्यांना दिले आश्वासन 

गर्जा महाराष्ट्र24न्यूज

अरुण हिंगमिरे
बोलठाण,(ता.नांदगाव) ता .११ आमदार सुहास कांदे यांनी जातेगाव,बोलठाण,जवळकी परिसरात तहसीलदार सिध्दार्थ मोरे कृषी अधिकारी जगदीश पाटील गटविकास अधिकारी गणेश चौधरी ग्रामविकास अधिकारी पवन थोरात,भगवान जाधव आणि कृषी पर्यवेक्षक या शासकीय अधिकाऱ्यांच्या लव्याजम्यासह  शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन बेमोसमी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली,
यावेळी झालेले नुकसान पाहून आमदार सुहास कांदे हे भावुक झाले.वर्षभर पोटच्या मुलासारखे पीक जपून नैसर्गिक आपत्तीने क्षणात नाहीसे होणे अतिशय वेदनादायी आहे मीही शेतकऱ्याचा मुलगा असल्याने मला याची पूर्ण जाणीव आहे.त्यामुळे धीर सोडू नका आमदार व सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे लवकरात लवकर आपल्याला ही झालेली नुकसान भरपाई मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील.असे आश्वासन यावेळी आमदार सुहास कांदे यांनी दिले.व दोन दिवसात परिसरातील सर्व शेतकऱ्यांचे १००% पंचनामे करण्याचे आदेश प्रशासकीय यंत्रणेला दिल्या. यासाठी अधिकारी व कर्मचारी यांची संख्या त्वरित वाढविण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.तालुक्यातील पुर्व भागात दि.९ रोजी रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान जातेगांव जिल्हा परिषद गटात कुसुमतेल,ढेकु खु.आणि बु.जातेगांव,वसंत नगर एक व दोन,चंदनपुरी,लोढरे,बोलठाण,गोंडेगांव,जवळची,रोहिले इत्यादी ठिकाणी अचानक प्रचंड वादळीवाऱ्यासह गारपीट व बेमोसमी पाऊस झाल्याने शेतकरी बांधवांच्या हातातोंडाशी आलेला घास आसमानी संकटाने हिरावून घेतला.निंबू बोराच्या आकाराच्या गारांचा शेतात अक्षरशः तीन ते पाच इंच थर साचला होता.जिकडे पाहावे तिकडे जमिनीवर सफेत चादर अंथरली असल्याचे चित्र दिसत होते. यामध्ये या भागातील नगदी पीक म्हणून लागवड करण्यात येत असलेला लाल कांदा, उन्हाळी कांदा,मका,इत्यादी पिकांचे तसेच टरबूज,खरबूज,आंबा,रामभळ,आणि शिमला मिरची,टमाटे, कोथिंबीर, इतर पालेभाज्यांचे १०० % नुकसान झाले आहे.
याप्रसंगी बोलठाणचे सरपंच वाल्मीक गायकवाड,जातेगांव येथील उपसरपंच पंढरीनाथ पवार,गुलाब चव्हाण,मनोज रिंढे,अनिल सोनवणे,गणेश व्यवहारे,संदीप सूर्यवंशी,भाऊसाहेब सूर्यवंशी, बंडू पाटील,गूलाब पाटील,संतोष गायकवाड,अनिल रिंढे,रफिक पठाण, गोकुळ कोठारी,सुभाष पवार,भरत गायकवाड,नाना थोरात,अंकूश पगारे,मारुती सोनवणे,रमेश पाटील यांच्यासह उपस्थित शेतकरी बांधवांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.