ताज्या घडामोडी
Trending

तातडीने पंचनामे करून अहवाल पाठवा;आमदार सुहास कांदे,

दोन दिवसात तालुक्यात पाच हजार हेकटरातील नुकसान

गर्जा महाराष्ट्र24न्यूज वृत्तसेवा
नांदगाव,ता १२ गेल्याच आठवड्यात अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या तालुक्यातील विविध गावे बाधित झाल्यावर त्या धक्क्यातून सावरत नाही तोच शनिवार व रविवारच्या सलग दोन दिवस अवकाळी पावसाने पुन्हा शेतकऱ्यांना संकटात घेरले परिणामी मागील पंचनामे पूर्ण होत नाही तोच पुन्हा नासाडी झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची नौबत शेतकऱ्यावर ओढविली आहे बेमोसमी पाऊस, वादळी वारा व गारपीटीमुळे बाधित झालेल्या गावांची संख्या देखील वाढली आहे तालुक्यातील अट्ठेचाळीस गावातील बारा हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या पाच हजाराहून अधिक हेक्टरातील पिकांची अतोनात हानी झाली कांदा पीक तर गेल्यात जमा झाले मागच्या आठवड्यात  सव्वीसशे हेकटरातील कांदा पिकाची नासाडी झाली त्यात दोन  दिवसाच्या गारपिटी मुळे दुपटीने भर पडली शनिवार रविवारच्या गारपिटीत चार हजार ८३० हेकटरातील कांदा पिकांची प्रचंड हानी झाली हेक्टर निहाय नुकसान झालेल्या विविध पिकांच्या नुकसान  पुढीलप्रमाणे ४४  गहू, मका ५३,भाजीपाला १८,बाजरी १९५ ऊस ७ पपई १० सूर्यफूल ३,एकूण ५ हजार १६० बहुवार्षिक  पिके आंबा १० निबू ९ डाळींब १८ मोसंबी ८ चिकू ८ पेरू १ द्राक्षे ५ एकूण ५ हजार २१८ हेकटर दरम्यान आज आमदार सुहास कांदे यांनी दूरध्वनी द्वारे तहसीलदार डॉ सिद्धार्थ मोरे तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील यांच्याकडून तालुक्यातील अवकाळी पावसामुळे क्षतिग्रस्त गावनिहाय नुकसानीचा आढावा जाणून घेतला व तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्यात नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन अहवाल तात्काळ शासनास सादर करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या बेमोसमी पाऊस, वादळी वारा, विजांचा कडकडाट व गारपिटीने थैमान घातल्याने उन्हाळी कांदा, गहू, हरभरा, आंबा, भाजीपाला पिकांचे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे फोटो ओळी दऱ्हेल(ता नांदगाव) :- येथील शेतकरी सतीश पाटील यांच्या शेतातील नुकसानीची  पाहणी करताना गटविकास अधिकारी गणेश चौधरी कृषी अधिकारी जगदीश पाटील आदी

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.