ताज्या घडामोडी
Trending

नांदगाव – येवला रस्त्यावर बेलदारवाडी जवळ कंटेनर चा अपघात

येवला रस्त्यावर खड्डे ठरताय अपघाचे हॉटस्टॉप

सकाळ वृत्तसेवा
बाणगाव बुद्रुक ता.१३ नांदगाव – येवला रस्ता अपघातात चा हॉट स्पॉट ठरला आहे गुरुवारी ता.१३ रोजी दुपारच्या वेळी बेलदार वाडी येथे वळणावर कंटेनर गाडी क्रमांक MH 46 AF 9204 हा पलटी झाल्याने अपघात झाला असून दैव बलवत्तर असल्याने चालक बचावला आहे.

नांदगाव – येवल रस्त्यावर अपघाताची मालिका सुरू असून या रस्त्यावर कायमच अपघातात होत असून या मध्ये जीवित हानी होत आहे या रस्त्यावर बेलदार वाडी जवळ असलेल्या व्यापाऱ्यांच्या खळ्यावर कंटेनर मध्ये कांदा लोड करून तो नांदगाव च्या दिशेने जाताना काही अंतरा नंतर वळणावर उताऱ्यावर महाकाय कंटेनर पलटी झाला सुदैवाने कंटेनर चा भाग रस्त्याच्या कडेला पडला गेला तो या वेळी जर नादगावं हुन येवल्यात च्या दिशेने वाहन जात असते तर मोठी जीवित हानी घडली असती अपघातानंतर कंटेनर चालकांना उपस्थितांनी केबीनमधून बाहेर काढले .

****ठळक
नांदगाव येवला रस्त्याचे काम दोन वर्षपासून संथ गतीने सुरू आहे हे काम पुर्ण होण्यासाठी वेळोवेळी आंदोलने झाली पण या कामात जलदगती काही मिळत नाही तसेच या रस्त्यावर मोठे महाकाय खड्डे पडले असून हे खडे बुजविण्याचे कष्ट ठेकेदार घेत नाही व वळणावर व अरुंद पुलाजवळ दिशा फलक नसल्याने वाहन चालकांना वाहन चालविताना अंदाज येत नाही पुढे काम मागे खड्डे अशी रस्त्याची अवस्था झाली आहे या मुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे,आठवड्यात शहराच्या एस टी कॉलनी जवळ रस्त्याच्या मधोमध असल्याला खड्यामुळे या ठेकेदाराच्या दोन काँक्रीट ट्रक्स मध्ये अपघात झाला असून या मध्ये एका ट्रक् चे मोठे नुकसान झाले आहे पण तरी ही हा खडा बुजविण्याची तसदी ठेकेदाराकडून घेण्यात आली नाही



फोटो ओळ
१) नांदगाव – येवला रस्त्यावर बेलदार वाडी जवळ अपघात ग्रस्त कंटेनर
2) मल्हारवाडी जवळ अपघातास कारणीभूत होत असलेले खड्डे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.