ताज्या घडामोडी

नांदगावला मुद्रांक स्टॅम्प पेपरचा पुरेसा साठा उपलब्ध ; 2 दिवस झाला तुटवडा

सोमवारी विक्रेत्यांच्या कडे स्टँम्प उपलब्ध होणार

गर्जा महाराष्ट्र24न्यूज वृत्तसेवा
नांदगाव ता.१४ राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना कांदा अनुदान पोटी ३५० रूपये क्विंटल जाहीर केले असून त्यासाठी त्यासाठी अनेक अटी व शर्ती लागू करण्यात आल्या आहेत त्यापैकी कांदे जर मुलाच्या नावाने विक्री केले असेल व ७/१२ वडीलाच्या नावावर असेल तर त्यासाठी १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र तयार करून देणे बंधनकारक असल्याने शेतकऱ्यांकडून १०० रूपयाचा स्टॅम्प पेपरची मागणी होत असून शहरातील मुद्रांक विक्रेत्यांकडे १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपर घेण्यासाठी गर्दी पहायला मिळत आहे.त्यात नांदगाव शहरात सोमवार ता.१० पासून स्टँम्प पेपर चा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना स्टँम्प मिळण्यास तारेवरची कसरत करावी लागत आहे..

नांदगाव शहरात काही मोजकेच मुद्रांक विक्रेते आहेत.त्यांच्याकडे स्टँम्प खरेदीसाठी लोकांची गर्दी होत आहे.मुद्रांक विक्रेत्यांची संख्या कमी असल्यामुळे स्टॅम्प पेपर फक्त त्यांच्याकडेच असतात.
.नांदगाव च्या जुन्या तहसील कार्यालय आवारात स्टॅम्प पेपर विकण्यासाठी मुद्रांक विक्रेत्यांना परवानगी दिलेली आहे.. मात्र

नांदगाव शहरात सोमवार ता.१० एप्रिल पासून दोन दिवस बीएसएनएलची केबल कट झाल्याने इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्याने स्टँम्प विक्रेताना ऑनलाइन चलन भरता न आल्याने स्टँम्प घेता आले त्यामुळे स्टॅम्प पेपर तुटवडा झाला या तुटवड्याचा गैरफायदा फायदा घेऊन काही मुद्रांक विक्रेते चढ्या भावाने मुद्रांक विक्री करीत असल्याचा आरोप उपस्थित नागरिकांनी केला आहे.नांदगाव जुन्या तहसील आणि नवीन तहसील कार्यालयाबाहेर ही स्थिती दिसून आली आहे.

प्रतिक्रिया…
बीएसएनएलची केबल कट झाल्याने सोमवार ता १० पासून दोन दिवस इंटरनेट सुविधा बंद असल्याने शासनाच्या ट्रेझरीचे ऑनलाइन व्यवहार ठप्प झाले होते.ट्रेझरीत चलन भरता येत नसल्याने विक्रेत्यांना स्टॅम्प पेपर मिळालेले नाही. मी १२ तारखेला कार्यालयात रुजू होतातच बी एस एल कार्यालयात पत्र व्यवहार करून व त्याच दिवशी इंटरनेट कनेक्शन सुविधा सुरू केली व मुद्रांक कोटा उपलब्ध करून नांदगाव व मनमाड ला विक्रेता कडे पुरेपूर उपलब्ध करून दिला आहे आता स्टँम्प चा तुटवडा नाही

मधुकर हाजारे – उपकोषागार अधिकारी नांदगाव

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.