ताज्या घडामोडी

लक्ष्मीनगरला आवकळी पावसाने झोडपले

भवानी मातेच्या यात्राउत्सववर विर्जन

गर्जा महाराष्ट्र24 न्यूज वृत्तसेवा
नांदगाव ता.१४ नांदगाव शहरात व तालुक्यातील लक्ष्मीनगर येथे शुक्रवारी (ता.१४)ला सायंकाळी ५ वाजता अवकाळी पावसाला सुरवात झाली लक्ष्मीनगर गावात भवानी मातेचे यात्राउत्सव  असल्याने अचानकपणे आलेल्या पावसाने नागरिकांची व व्यवसायकांची धावपळ झाली तालुक्यात आवकळी गारपिटी व पावसाने शेतातील पिके झाकण्यासाठी बळीराजाची धावपळ उडाली.
शुक्रवारी ( ता.०१४)ला सायंकाळी ५ वाजता लक्ष्मीनगर येथे जोरदार  वाऱ्यांसह पाऊस झाला यामुळे शेतात  झाकलेले कांदे वाऱ्यामुळे ताडपत्री उडाल्याने कांदे पावसाने,उन्हाळी कांदे,कांद्याचे डोंगळे,उन्हाळी मका,टमाटे,पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.लक्ष्मीनगर येथे ग्रामदेवता भवानी मातेचा सुरू असलेल्या यात्राउत्सव वर विर्जन पडले आहे.आवकळी गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे,पिकासाठी घेतले ले पीक कर्ज कसे परतफेड करायचा या प्रश्नांनाने बळीराजा हतबल झाला आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.