ताज्या घडामोडी

डांगसौंदाणे येथे पुन्हा अवकाळी पाऊस अन् गारपीटीचा कहर

गर्जा महाराष्ट्र24 न्यूज
सटाणा ता.१५ आज शनिवारी ता.१५ रोजी पुन्हा संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान एक तास जोरदार आवकळी पर्जन्यवृष्टी झाली व अर्धा तास गारपीट झाली.या गारपिटीमुळे शेतातील उरलेसुरले पिके ही उध्वस्त झाले. संपूर्ण गावात बळीराजांमध्ये नाराजी पसरली आहे पिकांचे होत्याचे नव्हते झाले.
10 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवताच गावाला अतिवृष्टी व भयंकर अशा गारपिटीने झोडपले होते.कांदे,टमाटे,मिरची व इतर सर्व पिकांना मोठा झटका बसला व शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले होते.आज पुन्हा डांगसौंदाणे परिसराला पावसाने व गारांनी झोडपले.आता शेतकरी वर्ग सरकारकडे मदतीची अपेक्षा ठेवून याचना करत आहेत. सरकार मायबाप आता शेतकऱ्यांना या संकटातून सावरावे अशी,अपेक्षा शेतकरी वर्ग करत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.