आपला जिल्हा
Trending

नांदगावला १२ तास अभ्यास करून डॉ. बाबासाहेब आंबेडकराना चिमुकल्यांनी केले अभिवादन

आधार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने उपक्रमाचे आयोजन

गर्जा महाराष्ट्र24 न्यूज
नांदगाव ता.१५ :- येथे १२ तास अभ्यास करून डॉ. बाबासाहेब आंबेडकराना चिमुकल्यांनी केले अभिवादन
बारा तास पुस्तक वाचन या कार्यक्रमाचे नियोजन आधार बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा समाजसेविका अड – विद्या कसबे व आदिवासी जनसमुदाय बहुउद्देशीय संस्था नांदगाव अध्यक्ष समाजसेविका जयश्री युवराज डोळे यांनी केले नेहा कोलगे संगीता साळवे,वर्षा मोरे तानसेन भाऊ जगताप रवींद्र भाऊ साळवे पत्रकार संदीप जेजुरकर यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे उद्घाटक सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय मुख्याध्यापक ईश्वर ठाकूर,तसेच जिल्हा परिषद शिक्षक प्रकाश मोरे यांच्या हस्ते करण्यात आले पुस्तक वाचणारे विद्यार्थिनी रुही विद्या सुदर्शन अभ्यंकर आरोही जयश्री युवराज डोळे मारिया नसीम कुरेशी मरियम नसीम कुरेशी जागृती वसंत अहिरे आम्रपाली वसंत अहिरे निखिल वसंत अहिरे दुर्गा सोमनाथ शिरसाट आदित्य दत्तू आवारे आफरीन खालील मंसूरी हे सर्व विद्यार्थी १२ तास अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन केले यामध्ये इयत्ता पहिली पासून इयत्ता दहावी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते
या दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची रथात मिरवणूक काढण्यात आली रेल्वे मशिद जवळील मुस्लिम बांधवांनी मिरवणुकीत सहभागी आंबेडकर अनुयायी यांचे स्वागत केले बौध्द बांधवाना शरबत वाटप केले तसेच मौर्या प्रतिष्ठाण ग्रुपच्या वतीने ही शरबत वाटप केले मिरवणूक साकोरा रोड,दादासाहेब डी एम मार्ग ,रेल्वे स्टेशन रोड,बस स्थानक,मोकळ नगर,शांती बाग,गिरणा नगर चर्च शेवटी येथील मिरवणुक रथ आंबेडकर चौक येथे आले भिम दर्शनासाठी मिरवणुकीत जनसागर उसळला होता या मिरवणुकीत फुले जयंती शिवजयंतीचे पदाधिकारी,सदस्य सहभागी झाले होते

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.