ताज्या घडामोडी

श्री क्षेत्र श्री पिनाकेश्वर चरणी हजारो भाविक नतमस्तक

तीन दिवसात यात्रेत लाखोंची उलाढाल

गर्जा महाराष्ट्र24 न्यूज वृत्तसेवा
अरुण हिंगमीरे
जातेगाव (ता. नांदगाव ) ता.१६ नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील श्री पिनाकेश्वर महादेवाची दिनांक चोवीस एप्रिल रोजी चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी यात्रा उत्सवाच्या निमित्ताने खानदेश मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील आणि पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी श्री पिनाकेश्वर महादेवाच्या यात्रेनिमित्त येऊन देवाच्या रात्री अकरा ते सकाळी सात वाजेपर्यंत असणाऱ्या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन देवाच्या चरणी नतमस्तक झाले.
तीन दिवस छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू असलेल्या या यात्रेमध्ये औरंगाबाद जळगाव नाशिक जिल्ह्यातील मिठाईची, मुलांच्या खेळणी तसेच भांडे व इतर गृह उपयोगी वस्तू त्याचप्रमाणे रहाट पाळने, इत्यादी व्यवसायीकांचा चांगला व्यवसाय झाल्याने लाखो रुपयांची उलाढाल झाली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की नाशिक जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे महादेवाचे देवस्थान म्हणून ओळखले जाणारे जातेगांव येथील श्री पिनाकेश्वर महादेवाचा वार्षिक यात्रोत्सव चैत्र शुद्ध ९ मी. ला असल्याने यंदाही सात दिवस अगोदर पासून धार्मिक रितीरिवाजा प्रमाणे चैत्र शु द्वितीया च्या दिवशी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील देवी दाक्षयानी मातेला येथील देवस्थानातर्फे देवाची प्रतिमा व मानाची वस्त्रे घेऊन महादेव मंदिर भजनी मंडळ व ग्रामस्थ रवाना झाले होते, ते सोमवारी सायंकाळी पाच वाजता पुन्हा परत आल्यानंतर अबालवृद्ध व तरुणांनी दंडवतीचे व्रत केले, या मध्ये व्रत सुरू झाल्यापासून दररोज अंगात शर्ट बनियन वस्त्र परिधान करणे वर्ज करतात त्याचप्रमाणे पलंगावर व खाटेवर उंट ठिकाणी झोपणं वर्ज करून दररोज गळ्यात चाफ्याच्या फुलांच्या माळा तयार करून स्वतः च्या गळ्यात घालून भल्या पहाटे श्रद्धापूर्वक देवाचे नामस्मरण करत व्रताची पूर्तता करण्यासाठी रवाना होतात. अशा या अनोखे व्रत पाच दिवस सुरू असते, व्रताची सांगता येथून सात किलोमीटर अंतरावर डोंगरावर असलेल्या मंदिरापर्यंत टप्याटप्याने जातात आणि पाचव्या दिवशी नवमीच्या दिवशी करतात, व्रत पुर्ण झाल्याच्या आनंदात नृत्य करतात,
दिवसभर डोंगरावरील मंदिरासमोर यात्रा भरते व सायंकाळी मंदिरासमोरील ५१ फुकट दिपमाळ प्रज्वलित करून देवाच्या मुखवट्यास स्नान घालून स्वच्छ करतात त्यानंतर देवाचा मुखवटा मानकरी मंडळी नवीन कपड्याने स्वतः च्या पोटावर बांधून गावच्या वेशी पर्यंत घेऊन येतात, त्यानंतर गावातील ग्रामस्थ वाद्य वेशी पर्यंत जाऊन मुखवटा आलेल्या व्यक्तीला गावातील महादेव मंदिरात मानाने घेऊन येतात त्यानंतर तेथे आकर्षक सजवलेल्या चांदीच्या पालखीमध्ये मुखवटा विराजमान केला जातो, व १०.३० वाजता मंदिरापासून गावातील प्रमुख मार्गावरून सनी,ढोल ताशांच्या गजरात आणि भजनाच्या दुमदूत्या स्वरात रंगीबेरंगी आतषबाजी करत देवाच्या पालखीची मिरवणूक काढण्यात येते.हि मजल दर मजल करत मिरवणूक रात्रभर सुरू असते.यावेळी सुमारे पंन्नास फुट उंच दोन भागवत ध्वज सुरू असलेल्या पालखीच्या मिरवणूकीच्या अग्रस्थानी होते.यावेळी नयनरम्य सोहळ्याचे साक्षीदार होवून आबालवृद्धांसह तरुणांनी नृत्य केले,चौकाचौकात महिला देवाची पूजा करतात व रेवड्या व पेढ्याचा प्रसाद वाटतात, या सोहळ्याला मराठवाडा,खान्देश मध्य महाराष्ट्रातील हजारो भाविकांनी या वर्षी दर्शनाचा लाभ घेतला.या दरम्यान गावातील हिंदू मुस्लीम सर्व समाजातील नागरिक मांसाहार वर्ज्य करतात,अशा या यात्रेत मुस्लिम बांधव देखील सहभागी होवून देवाची पूजा करतात व दर्शन घेतात. वरील यात्रा उत्सवातील सर्व धार्मिक कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री पिनाकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांनी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
शनिवार दि.१५ एप्रिल रोजी दुसर्या दिवशी सकाळी सात वाजता पालखी सोहळ्याचे उत्तरपूजा केल्यानंतर सोहळ्याची सांगता झाली या पूजेचे पौरोहित्य दत्तात्रय भट यांनी केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.