आपला जिल्हा

नियमित पीककर्ज भरणाऱ्या बळीराजाचा सन्मान

नादगाव ला महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या वतीने शेतकऱ्यांचा सन्मान

गर्जा महाराष्ट्र24 न्यूज वृत्तसेवा
बाबासाहेब कदम

नांदगाव ता. १६ महाराष्ट्र ग्रामीण बँक क्षेत्रीय विभागाच्या च्या वतीने १४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने सन्मान बळीराजाचा,वित्तीय साक्षरता अभियानांतर्गत पीक कर्ज नियमितपणे नुतनीकरण करणा-या शेतक- यांचे क्षेत्रीय व्यवस्थापक सोमनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सन्मान व सत्कार करण्याचे अभियान संपूर्ण जिल्हा भर राबविण्यात आले होते.
.या निमित्ताने नांदगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक राकेश ढाले यांच्या हस्ते काल दि. १४ एप्रिल रोजी नांदगाव तालुक्यातील पीककर्ज नियमिय नुतनीकरण करणा-या शेतक-यांचा सन्मान व सत्कार सोहळा उत्साहात संपन्न करण्यात आले. या कार्यक्रचे अध्यक्ष रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष देविदास मोरे, शिंदे गटाचे शिवसेनेचे कपिल तेलुरे,राजेंद्र गुडेकर, राजाभाऊ, पवार यांची प्रमुख उपस्थिती यांची होती या वेळी सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
तर शाखा व्यवस्थापक राकेश ढाले यांनी प्रमुख पाहुण्यांचे पाहुण्यांचा सत्कार केले. यावेळी शाखा व्यवस्थापक राकेश ढाले यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने महाराष्ट्र ग्रामीण बँक २०२३-२४ या वषार्चे शंभर • टक्के पीककर्ज नूतनीकरणाच्या कामाला वेग यावा त्या साठी सर्वत्र महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून दि.१४ एप्रिल शुक्रवार रोजी बळीराजाचा सन्मान व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आले आहे या अनुषंगाने नांदगाव तालुक्यातील ६८ शेतक-यांचे सन्मान व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आले आहे. या वेळी या कार्यक्रमास उपस्थित बाणगाव येथील येथील शेतकरी तथा माजी सरपंच शांताराम पाटील, भाऊसाहेब सदगीर,रामहरी गोराडे, रामकृष्ण निकम, सोसायटीचे संचालक संजय लासुरे, चांगदेव देवकर, चांगदेव काजळे, प्रकाश गोसावी,गणेश कवडे,मंगलबाई कवडे,छाया गोसावी सह आदी उपस्थित होते.या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश तुंगार यांनी केले.यशस्वीतेसाठी सेवक प्रशांत शेळके,सतीश देशमुख,बी,सी चालक समाधान देवकर,पवार, शरद नदं,विशाल काळे, धनंजय देशमुख व राजेश पवार यांनी परिश्रम घेतले तर आभार मंगेश पाटील यांनी मानले

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.