ताज्या घडामोडी

मिशन भागीरथी प्रयास मध्ये नांदगाव तालुका सर्वोत्कृष्ट

जिल्हा टॅंकर मुक्तीसाठी ‘मिशन भगीरथी प्रयास..

गर्जा महाराष्ट्र24न्यूज वृत्तसेवा

बाबासाहेब कदम

नांदगाव  ता.२२ जिल्ह्यातील दुष्काळी गावातील  चित्र पाटलण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्हा टॅंकरमुक्त करण्याचा संकल्प करत,‘मिशन भगीरथी प्रयास’हाती घेतले असून.या मिशन अंतर्गत जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांमधील  पाणी टंचाई असलेल्या दुष्काळी गावांमध्ये २० ते २५ सिमेंट बंधारे बांधली जाणार आहेत.या मिशन अंतर्गत नांदगाव तालुक्यातील  गावात साखळी बंधाऱ्यांची कामे सर्वात आधी कामे झाल्याने या कामांची उत्कृष्ट कामे म्हणून गौरविण्यात आले आहे.
नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी  श्रीमती.आशिमा मित्तल व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी   अर्जुन गुंडे व उप मुख्यकार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत.रवींद्र परदेशी, यांच्या कल्पनेतून “जल समृद्ध गाव ” व समृद्ध शेतकरी” या ध्येयावर आधारीक  नाविन्यपूर्ण उपक्रमा अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मिशन भगीरथ प्रयास उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून. त्याअनुषंगाने नांदगाव तालुक्यातील ८ ग्रामपंचायतची निवड करण्यात आलेली आहे. त्यापैकी कसाबखेडा ग्रामपंचायत अंतर्गत पोही गावाचा  यात समावेश करण्यात आलेला आहे. पोही गावाची लोकसंख्या ७४३ असून  २६४ कुटुंब संख्या आहे. सदर उपक्रमांअंतर्गत मिशन भगीरथ मोहीम आखून पोही गावामध्ये साखळी पध्दतीने एकूण १० सिमेंट बंधारे करण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार शाखा अभियंता जि प लपा उपविभाग मालेगाव यांनी स्थळ पाहणी करून अंदाजपत्रक उपलब्ध करून दिलेले आहे. त्यानुसार प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश प्राप्त करून काम सुरू करण्यात आले असून या कामास.लघुपाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता यांनी वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन केले जात आहे. तसेच.गटविकास अधिकारी.गणेश चौधरी हे वेळोवेळी भेटी देऊन आढावा घेऊन सदर कामाबाबत मार्गदर्शन करत आहे. प्रसात्विक १० बंधाऱ्या पैकी एक बंधारा पूर्ण करण्यात आला. आहे सदर बंधाऱ्याचे एस्टीमेट ७ लक्ष रुपय असून  पाणी साठवणूक क्षमता जवळ जवळ 0.46 mcft आहे.सदर बंधाऱ्याच्या वरच्या बाजूला वन विभागाचे क्षेत्र असून डोंगर राग सुद्धा आहे. पावसाळ्यात वरून येणारे डोगराचे  पाणी हे बंधाऱ्यात अडवण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर दोन्ही बाजूच्या शेतकरी यांना त्याचा शेतीसाठी उपयोग होऊन भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. तसेच सदरची साईट गावाच्या वरच्या बाजूला असल्याने गावातील सर्व शेतकरी यांना त्याचा लाभ होणार आहे. 

प्रतिक्रिया….
मिशन भागीरथी प्रयास अंतर्गत नांदगाव तालुक्यातील ८ गावांचा समावेश असून या गावात ४८ साखळी बंधारे बांधण्याचे नियोजन केले आहे प्रायोगिक तत्त्वावर पोही व परधाडी या दोन गावातील १०० टक्के बंधारे पूर्ण केले आहे यामुळे या गावातील पावसाचे पाणी पूर्ण अडवले जाणार आहे यामुळे गावातील शेतीसाठी पाणी व पिण्याचा पाणी प्रश्न १०० टक्के सुटणार आहे
नाशिक जिल्ह्यात नांदगाव तालुक्यात कामे पूर्ण झाल्याने आमच्या टीमचे  मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे
गणेश चोधरी – गटविकास अधिकारी नांदगाव

*****

सदर कामासाठी वेळोवेळी तालुक्याचे गटविकास अधिकारी गणेश चौधरी,सहा गट विकास अधिकारी श्री.दळवी , विस्तार अधिकारी देविदास.मांडवडे, श्री ढवळे व मग्रारोहयोचे टीम यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.ही कामे उत्कृष्ट रित्या पूर्ण झाल्याने आमचा पाणी प्रश्न कायमचा मिटणार आहे याबद्दल गावातील सर्व शेतकरी च्या वतीने प्रशासनाचे आभार 
श्रीमती.सुनीता कांतीलाल चव्हाण :/ सरपंच कसाबखेडा

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.