ताज्या घडामोडी

नांदगाव तालुक्यात ईदनिमित्त मशिदीत सामूहिक नमाजपठण

मनमाडला रमजान ईद मोठ्या उत्साहात मंदिरातील नळावर वजू आणि मशिदीत नमाज अदा

गर्जा महाराष्ट्र24न्यूज वृत्तसेवा

नांदगाव,ता. २३ : शहरात प्रेम आणि बंधुत्वाचे प्रतीक असलेली रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली.शहरातील प्रमुख मशिदीत पहाटेची नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी इदगाह मैदानात उपस्थित झाल्यानंतर धर्मगुरू मुफ्ती महमद फईम शेख यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्यनमाजपठण केले.नमाजपठण झाल्यानंतर एकमेकाची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. महिनाभराच्या उपवासानंतर ईदचा चांद दिसल्याचे जाहीर झाल्यानंतर काल सायंकाळी शहरातल्या सर्वच मशिदी बाहेर ईदच्या पूर्वसंध्येला फित्रचे दान करण्यात आले

●●● मनमाड ●●●●

ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद मनमाड शहर परिसरात पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त जामा मशिदीचे मौलाना अस्लम रिझवी यांच्या नेतृत्वाखाली आय.यु.डी.पी भागातील नवीन आणि जुनी या दोन्ही ईदगाह मैदानासह शहरातील विविध मशिदीमध्ये हजारो मुस्लिम बांधवांनी ईदची सामूहिक नमाजपठण केली. यावेळी देशात, जगात शांतता निर्माण व्हावी. शहरातील सोबत राज्यासह देशावर आलेलं संकट दूर व्हावे यांसह देशात समाधानकारक पाऊस पडावा, सर्व जातीधर्मांच्या लोकांमध्ये बंधुभाव दृढ व्हावा यासाठी विशेष दुवा करण्यात आली.
आययूडीपी भागातील ईदगाह मैदानावर सकाळी ८.४५ वाजता जामा मशीदचे मौलाना असलम रिजवी यांच्या नेतृत्वाखाली ईदची नमाज अदा करण्यात आली. यावेळी सुमारे दहा हजार मुस्लिम बांधव उपस्थित होते. तालुक्याचे आमदार सुहास कांदे, शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक,पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.सचिनकुमार पटेल आदींसह इतर हिंदू बांधवांनी प्रमुख मौलानांचा सत्कार करून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.ईदगाह मैदानावर पालिका प्रशासनाने सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. फुले-शाहू- आंबेडकर मुस्लिम विचारमंचचे फिरोज शेख यांनी यंदा उन्हाचा चांगलाच तडाखा जास्त असल्याने व नुकतीच खारघर येथे सार्वजनिक कार्यक्रमात

सामाजिक बांधिलकीचे दर्शन ★★★★
मुस्लिम धर्मात नमाज अदा करण्यासाठी आधी वजू अर्थात हातपाय, तोंड स्वच्छ धुवून घ्यावे लागतात. यासाठी मशिदीत वजूखाना उपलब्ध असतात, मात्र ईदगाह मैदानावर त्याची व्यवस्था नसते. यामुळे सर्वजण घरून वजू करूनच येतात. काहीजण ईदगाहजवळ कुणाच्या घरी व्यवस्था करून घेतात. काल मनमाड येथील ईदगाहजवळील मंदिरात असलेल्या नळावर अनेकांनी वजू केले व मग नमाज अदा केली. यामुळे काल मंदिरात वजू आणि ईदगाहावर नमाज अशीच चर्चा सुरू होती. यामुळे एक सामाजिक बांधिलकीचा संदेश देखील मिळाला.
उष्माघातामुळे काही जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. यामुळे नमाजसाठी मंडप उभारण्यात यावा,अशी मागणी पत्राद्वारे केली होती.याची पालिका प्रशासनाने गंभीरपणे तात्काळ दखल घेऊन काल काही प्रमाणात मंडप उभारणी करून दिला. याचा मुस्लिम बांधवांना सहारा मिळाला.कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याबद्दल मुस्लिम समाजातर्फे आभार मानून त्यांचाही सन्मान करण्यात आला. दोन्ही ईदगाहसह शहरातील विविध भागातील मशिदींमध्ये देखील ईदची नमाज पठण करण्यात आली.सर्वच ठिकाणी शांतता व सुखसमृद्धीसाठी दुवा करण्यात आली.ईदगाहबाहेर गेटवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांच्यातर्फे पाणी बॉटल वाटप करण्यात आले होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.