ताज्या घडामोडी

आधारवड हरपला!!भालूरचे नामदेव (आण्णा )लहिरे यांचं निधन,

गर्जा महाराष्ट्र24न्यूज वृत्तसेवा

नांदगाव ता.२३ तालुक्यातील भालूर गावचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नामदेव (आण्णा ) फकीरा लहिरे यांचे शनिवार ता 15 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10:55 मिनिटांनी निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय 74 वर्षाचे होते.त्यांचा दशक्रिया विधी सोमवार ता 24 एप्रिल रोजी भालूर येथिल छत्रपती शिवाजी महाराज ग्रामपंचायत भालूर या ठिकाणी होईल सदर ठिकाणी ह. भ.प.शिवाजी महाराज तळेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होईल.बाबा प्रेमळ व परोपकारी स्वभावाने सर्वाना परिचित होते.त्यांच्या निधनाची वार्ता कळताच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सामाजिक,शैक्षणिक,राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
शेतकरी कुटुंबात जन्मलेले नामदेव (आण्णा) फकिरा लहिरे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं.त्यांच्या पश्चच्यात श्री.सुकदेव फकिरा लहिरे (भाऊ ),श्री साहेबराव फकिरा लहिरे (भाऊ ),श्री विक्रम फकिरा लहिरे (भाऊ ),ग.भा.सरस्वती नामदेव लहिरे (पत्नी ),श्री.दत्तु नामदेव लहिरे(मुलगा),विष्णू नामदेव लहिरे(मुलगा ),निर्मला गुलाब उगले(मुलगी )ममदापुर,अरुणा बाबासाहेब हिंगे.ब्राम्हणगाव (मुलगी ) तीन भाऊ, पाच बहिणी,दोन मुलं व दोन मुली, सुना,पुतणे,नातवंड असा मोठ्ठा परिवार आहे.नामदेव (आण्णा ) लहिरे यांच्या निधनामुळे संपूर्ण परिवारावर शोककळा कोसळली आहे.नामदेव आण्णा यांच्या निधनामूळ विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहून,त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडले आहे.त्यांचा जन्म 1 जून 1950 रोजी झाला त्यांच्या आई कै सीताबाई फकिरा लहिरे यांचं माहेर वैजापूर तालुक्यातील पाराळे येथिल शेळके घराण्यात होते.आण्णाचा जन्मही पाराळे येथे झाला.सुरुवातीला अत्यन्त गरिबीची परिस्थिती असायची अत्यन्त अगं मेहनतीचे कष्ट करून आपल्या भावंडच्या सोबती अत्यन्त कसरतीचे दिवस काढले.त्यानंतरही अलीकडे देखील परिस्थितीशी दोन हात करत सामना केला व आपला संसार स्वाभिमानाने केला.नामदेव (आण्णा) लहिरे राजकीय क्षेत्रातील जेष्ठ अनुभवी व नामवंत तज्ञ् व्यक्तीमत्त्व होते.ते प्रेमळ व परोपकारी स्वभावाने सर्वाना परिचित होते.दिलेल्या शब्दाला जागन पैस्यापेक्षा माणसाला महत्व देणं अन् समाजात स्वाभिमानाने जगणं अन् व्यक्तिशः रोष, वाद न ठेवता ते तत्वशा भांडायचे.सर्वांशी प्रेमाने व आपुलकीने वागायचे राजकीय हेवे-दावे विरहित वागण,लहान – सहान गोष्टी सोडून द्यायला शिकावं तर आण्णाकडूनच.असा त्यांचा स्वभाव होता.त्यांचा कणखर एकनिष्ठ स्वभाव अनेकांच्या मनात घर करून गेला आहे.आजही त्यांच्या स्वभावातील एकनिष्ठता मनाला खूप भावते..

शब्दांकन :-पत्रकार दिपक उगले येवला-ममदापुर

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.