ताज्या घडामोडी

डॉक्टरवाडीत कृत्रिम पाणी टँचाई,

ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांच्या मतभेदातमुळे पाणी समस्या निर्माण

गर्जा महाराष्ट्र24न्यूज वृत्तसेवा

नांदगाव ता.२४ नांदगाव तालुक्यातील डाॅक्टरवाडी येथील दोन पेयजल योजनावर तब्बल ५० लाखाहुन अधिक खर्च झाला पण अद्यापही ग्रामस्थांना प्यायला पुरेसे पाणी नाही कालबाह्या झालेल्या ५६ खेडी योजनेचे पाणी तीस दिवसातून कधीतरी मिळते ते ही शास्वत नाही गावचे कारभारी पाणी प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा गावात होत आहे या संदर्भात उघड तक्रार कोणी करीत नाही.त्यामुळे भर उन्हाळ्यात गावच्या महिलांना व नागरिकांना कृत्रिम पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

सूत्रांच्या माहिती नुसार माहिती अशी की डॉक्टरवाडीत ग्रामपंचायत मालकीची विहीर आहे पण ग्रामस्थांना विहिरीचे पाणी मिळत नाही.विहिरीतुन पाणी शेंदण्यासाठी व्यवस्था नाही. सन.२०१९ मध्ये तब्बल ४० लाख खर्चुन राष्ट्रीय पेयजल योजना राबविली पण त्या योजनेचा गावाला काही एक लाभ मिळाला नाही.लाखो रुपये खर्चुन प्यायला पाणीच मिळाले नाही ती पाणी पुरवठा योजना तर फेल गेली त्यानंतर लगेच १५ वित्त आयोगातुन ९ लाखाची पेयजल योजना राबविली तिही विवादात सापडली आहे.सन २०१९ पासून सन २०२२ पर्यंत एक नव्हे दोन पेयजल योजना राबविल्या पण गावाला पाण्याचा थेंब मिळत नाही.खाजगी जागेत एका शेतकऱ्यांने संमतीपत्रावर काही तत्वतावर विहिरीसाठी दोन गुंटे जागा दिली,त्या जागेवर विहीरही खोदली व पाणीही लागले पण पाणी उपसण्यासाठी वीज पुरवठा करण्यासाठी सोलरसाठी जागा पाहिजे आहे जागेच्या मोबदल्यात पाणी व सोलरची वीज द्या अशी मागणी जागा देणाऱ्या जागा मालक शेतकरी करीत आहे.त्यास ग्रामपंचायती ची तयार आहे तर त्यास काही ग्रामस्थांनी विरोध केला आहे यामुळे गत एक वर्षात या पेयजलचा लाभ लाभार्थीना मिळाला नाही.नागरीकाना पाणी पुरवठा उपलब्ध करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन पेचात सापडले आहे,
पाण्यासाठी नागरिकांना तप्त उन्हात भटकंती करावी लागत आहे.पाण्यासाठी लाखॊच्या नागरी योजना राबवूनही जनतेला त्याचा लाभ नाही, यावर कुणी उकल करायला तयार नाही पाण्यासाठी नागरीक यातना सोसत आहे यावर तालुका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थांच्यासह महिला कडून होत आहे

प्रतिक्रिया :
विहिरीसाठी संमती पञावर विहीरीला जागा मिळाली आहे,आता वीज पुरवठा करण्यासाठी सोलरसाठी जागा पाहिजे आहे जागेच्या मोबदल्यात पाणी व सोलरची वीज द्या अशी मागणी संबंधीत जागा मालक शेतकरी करीत आहे.
पवन थोरात – ग्रामसेवक.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.