ताज्या घडामोडी

सुतार समाजाच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनाच्या अध्यक्षपदी अँड सुदामआण्णा खैरनार यांची बिनविरोध निवड…

प्रभू विश्वकर्मा युवा अधिवेशनाच्या मुख्य आयोजन समिती अध्यक्षपदी पवन क्षिरसागर यांची निवड

गर्जा महाराष्ट्र24 न्यूज वृत्तसेवा
बाबासाहेब कदम

नाशिक ता.२४ महाराष्ट्र राज्यात सुतार- लोहार समाजाचे राज्यभरात सर्वप्रथम संघटनरुपी रोपटे लावणारे खंबीर नेतृत्व जेष्ठ नेते ऑड सुदामअण्णा खैरनार यांची सकल सुतार समाजाच्या राज्यव्यापी महाअधिवेशन 2023 च्या अध्यक्षपदी बिनव निवड झाली आहे

2 एप्रिल 2023 रोजी आळंदी येथील बैठकीसाठी संपूर्ण राज्यातून 500 पेक्षा जास्त समाज कार्यकर्ते उपस्थित होते बैठकीत समाजाच्या विविध प्रश्नावर प्रत्येक कार्यकर्त्यांनी अतिशय पोट तिडकेने आणि कळकळीने मांडणी केली समाजात असलेल्या अनेक संघटना समाजहितासाठी एका व्यासपीठावर याव्यात आणि महाअधिवेशनाच्या माध्यमातून त्या प्रश्नाची सोडवणूक राज्यकर्त्याकडून करून घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.यानंतर रविवारी (ता.२३ ) रोजी‌ सुतार समाजाच्या राज्यभरातील सगळ्या संघटनाचे प्रमुख मालेगाव येथील बैठकीसाठी उपस्थित होते नियोजित राज्यस्तरीय सुतार समाजाच्या महाअधिवेशनाच्या अध्यक्षपदी ऑड सुदामअण्णा खैरणार यांची एक मुखाने निवड करण्यात आली ऑड सुदामाअण्णा खैरणार यांचे शिक्षण बीए.एल.एल.बी झालेले आहे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्षपद अनेक वर्षे सांभाळले असून ते sawmill असोशीयन च्या अध्यक्षपदीही काम करीत आहे.ते सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी यशस्वी संभाळली आहे.सध्या ते भारतीय जनता पक्षाचे ओ‌.बी.सी सेलचे उपाध्यक्षपद त्यांच्याकडेच आहे.सुतार-लोहार संघाचे ते प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांचे काम खूप मोठ्या प्रमाणावर आहे.त्यांनी समाजाच्या प्रश्नासाठी वेळोवेळी मंत्रालयात,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी,तहसिलदार यांना निवेदन दिली मंत्रिमंडळाच्या बैठकीवर अनेक वेळा मोर्चे काढले.राज्यभरात अनेक जिल्ह्यातही मोर्चा काढले सुतार समाजाला भटक्यावर विमुक्त जातीमध्ये सामील करावे म्हणून उपोषणही केले.नाशिक येथे सुतार समाजाच्या प्रश्नासाठी गायकवाड हॉल येथे प्रचंड संख्येने मेळावा घेऊन सुतार समाजाची ताकद उभी केली.अशा जेष्ठ नेत्याला महाधिवेशनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.