नांदगाव पंचायत समितीच्या प्रभारी गटविकास अधिकारीपदी संजय गोसावी

गर्जा महाराष्ट्र २४ वृत्तसेवा
नांदगाव ता.०३ नांदगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाच्या रिक्त जागेवर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संजय गोसावी यांची प्रभारी गटविकास अधिकारी नियुक्ती झाली आहे,सोमवारी त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.त्यांचे येथील पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या .पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शासनाने महाराष्ट्र विकास सेवेतील गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या यात नांदगाव पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी संदीप दळवी यांची बदली कोपरगाव जिल्हा अहमदनगर येथे झाली आहेत नांदगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाच्या रिक्त जागेवर रावेरच्या जिल्हा जळगांवच्या गटविकास अधिकारी श्रीमती डी.ए.कोतवाल यांची नियुक्ती झाली आहेत श्रीमती कोतवाल रुजू न झाल्याने येथील रिक्त जागी पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी संजय गोसावी यांची प्रभारी गटविकास अधिकारी पदाचे सूत्र स्वीकारले प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी मग्रारोहयोचे सहाय्यक कार्यक्रम आधिकरी गणेश घुगे,वैभव ठाकरे वरिष्ठ सहाय्यक सुरेश पारखे,ग्रामविकास अधिकारी युवराज निकम,तांत्रिक अधिकारी विष्णु महाले,विकास राऊत,लोकेश पाटील विवेक देशमुख,CDEO सागर घुगे,दादा जाधव,कुणाल केदार गोपाल ठाकरे ग्रामरोजगार सेवक महेश चकोर सचिन निकम सचिन वाघ दत्तू काळे समाधान पवार आदीनी सत्कार केला.
कामांना देणार प्राधान्य…
आगामी काळात पंचायत समिती स्तरावरील विविध कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी आपले प्राध्यान्य असेल,असे प्रभारी गटविकास अधिकारी संजय गोसावी यांनी सांगितले.



