क्राईम

आधार इनेबल पेमेंट सिस्टीम ( AEPS ) व्दारे लाखो रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी जेरबंद 

नाशिक ग्रामीण सायबर पोलीसांची कामगिरी

गर्जा महाराष्ट्र24न्यूज वृत्तसेवा

नांदगाव,ता २० कुणाची लिंक शेअर्स केली नाही मात्र खात्यातून पैसे कमी होऊ लागल्याच्या घटनेतील तिघा संशयितांना नाशिक पोलिसांच्या ग्रामीण सायबर शाखेने ताब्यात घेतले वेहेळगाव येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेतील पळाशी येथील पंधरा ग्राहकांना दोन लाख ६६,७९९रुपयांचा गंडा या अज्ञात टोळीने घातला होता आधार सक्षम भुगतान प्रणालीचा वापर करीत कमी रकमा काढत असल्याने सुरुवातीला हा प्रकार लक्षात येत नव्हता मात्र त्यात सातत्य वाढल्यावर बँकेत तक्रार करण्यात आली नाशिक ग्रामीण सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. सत्यजित आमले यांचे पथकातील पोलीस उपनिरीक्षक दिपक देसले व पोलीस अंमलदारांनी वरील प्रकरणातील AEPS (आधार ईनेबल पेमेंट सिस्टीम) सेंटर बाबत तांत्रिक विश्लेषणाव्दारे माहीती काढून चाळीसगाव तालुक्यातून संशयित किशोर लक्ष्मण सोनवणे,वय २१, रा.उपखेडा, ता. चाळीसगांव, जि. जळगांव,रविंद्र विजय गोपाळ, वय २३, रा. बानगांव, ता.चाळीसगांव, जि.जळगांव,व सोमनाथ काकासाहेब भोंगाळ, वय २३,रा.बानगांव,ता.चाळीसगांव,जि.जळगांव यांना ताब्यात घेतले. आरोपी किशोर सोनवणे हा प्रधानमंत्री ग्रामीण डिजीटल साक्षरता अभियान अंतर्गत ऑनलाईन परिक्षांचे रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्याचे काम करत होता. सध्या तो धुळे येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात कॉम्प्युटर इंजिनियरींगचे शिक्षण घेत आहे. तसेच त्याचे दोन्ही साथीदार रविंद्र व सोमनाथ हे सध्या चाळीसगांव येथील आधारसेवा केंद्रावर काम करत होते. त्यांचेकडे अधिक तपास केला असता, त्यांनी माहे जानेवारी २०२३ मध्ये नांदगाव तालुक्यातील पळाशी व वेहेळगाव येथे आधारकार्ड अपडेशन कॅम्प घेतला होता. सदर कॅम्पमध्ये उपस्थित नागरीकांचे बायोमॅट्रीक फिंगर स्कॅनरव्दारे अंगठ्यांचे ठसे घेण्यात आले होते. यातील आरोपींनी नागरीकांचे अंगठयांचे ठशांचा डाटा संकलीत करून त्याव्दारे CSC Digipay ऑनलाईन मनी ट्रान्सफर सव्र्हस अॅपमध्ये नागरीकांचे ठशांचा वापर करून संबंधीतांचे बँक खात्यांवरून परस्पर पैसे काढून घेतले असल्याबाबत कबुली दिली आहे. सदर आरोपींचे कब्जातून लॅपटॉप, मोबाईल स्मार्टफोन, फोर फिंगर स्कॅनर मशिन, आयरीस मशिन असे साहीत्य जप्त करण्यात आले आहे. सदर आरोपींनी अलिशान जीवन व मौज-मजेसाठी सर्वसामान्य नागरीकांची ऑनलाईन फसवणूक करून पैसे काढले असल्याचे तपासादरम्यान निदर्शनास आले आहे सदर गुन्हयात अज्ञात इसमांनी पळाशी गावातील नागरीकांचे बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बेहळगाव, ता. नांदगाव येथील खात्यांमधून संमतीशिवाय आर्थिक फसवणूक करण्याचे इराद्याने एकूण २,६६,७९९/- रूपये कुठल्यातरी AEPS (आधार इनेबल पेमेंट सिस्टीम) सेंटर येथून अंगठयाचे ठशांव्दारे पैसे काढून घेतले म्हणून पळाशी, येथील समाधान संजय घुगे,यांनी फिर्याद दिली होती.ऑनलाईन फसवणूकीव्दारे संमतीशिवाय अपरोक्ष पैसे काढून घेतले जात होते.सदर बाबत नागरीकांनी संबंधीत बँक मॅनेजर यांचेकडे तक्रार केली असता, त्यांना समर्पक माहीती न मिळाल्याने त्यांनी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय येथे तक्रार केली होती.सदर तक्रारीबाबत नाशिक ग्रामीण सायबर पोलीसांनी तात्काळ•दखल घेवून चौकशी केली असता,पळाशी,ता. नांदगाव येथील सुमारे १५ लोकांचे AEPS (आधार ईनेबल पेमेंट सिस्टीम) सेंटर येथून अंगठ्याचे ठशांव्दारे परस्पर आनलाईन पैसे काढून घेतले असल्याबाबत माहीती मिळाली.त्यावरून सायबर पोलीस स्टेशन गुरनं ०८/२०२३ भादवि कलम ४२० सह आय टी अॅक्ट ६६ क, ६६ ड प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली तपासात सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सत्यजित आमले,सपोनि सुनिल पाटील,सपोनि सारीका चौधरी,पोउनि दिपक देसले,पोहवा बिपीन चौधरी,पोना प्रमोद जाधव, परिक्षित निकम,पोहवा डि.बी.बागुल,पोना नितीन करंडे,प्रदिप बहिरम, हेमंत गिलबिले,पोकॉ सुनिल धोकट,आकाश आंबोरे,तुषार खालकर, मपोकॉ माधुरी जाधव यांचे पथकाने सदरची कामगिरी केली आहे.आरोपींना वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून मा. न्यायालयाने त्यांची ०३ दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोनि श्री.सत्यजित आमले यांचे पथक करीत असून तपासाअंती यातील आरोपींकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे

नाशिक :- नांदगाव तालुक्यातील पळाशी येथील खातेदारांच्या खात्यातून ऑनलाईन गंडा घालणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील तिघांना पोलिसांच्या ग्रामीण सायबर शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले

●●●●●●●
पोलिसांचे नागरीकांना आवाहन 
नाशिक ग्रामीण जिल्हयातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, शासनमान्य आधारसेवा केंद्रावर जाऊनच आपली आधार संबंधीत माहीती अद्यावत करावी.कोणीही इसम अशाप्रकारे अनाधिकृत आधार अपडेशन कॅम्प घेत असेल तर नजीकचे पोलीस ठाणेशी तात्काळ संपर्क करावा. तसेच आधारकार्ड अद्यावत करण्याचे नावाखाली AEPS (आधार इनेबल पेमेंट सिस्टीम) सेंटरव्दारे ऑनलाईन फसवणूक झाल्यास त्वरीत संबंधीत बँक शाखा, नजीकीचे पोलीस ठाणे अथवा नाशिक ग्रामीण सायबर पोलीस ठाणे ( ०२५३-२२००४०८) येथे संपर्क साधावा.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.