क्राईम

पोलिस अधिकाऱ्याच्या कृत्याने पुणे हादरलं

आधी पत्नी-पुतण्याला संपवलं, मग स्वत:वर गोळी झाडली,

गर्जा महाराष्ट्र24 न्यूज वृत्तसेवा
पुणे ता.२५ अमरावती जिल्ह्यात पोलीस दलात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या भरत गायकवाड यांनी पत्नीसह पुतण्याची गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांना गोळ्या घालून संपवल्यानंतर भरत गायकवाड यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आपले जीवन संपवले.पुणे शहरात पहाटे सव्वातीन वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला असून या धक्कादायक घटनेमागील कारण अद्याप समोर आलेले नाही.मोनी गायकवाड (वय ४४) आणि पुतण्या दीपक गायकवाड (वय ३५) अशी गोळी झाडून खून केलेल्या दोघांची नावे आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,पुण्यातील बाणेर,बालेवाडी भागात गायकवाड कुटुंब वास्तव्यास होते.पोलीस दलात वरिष्ठ पदावर काम करत असलेले आणि सध्या सुट्टीवर असलेले भरत गायकवाड हे शनिवारीच पुण्यातील घरी आले होते.मात्र आज पहाटे त्यांनी आधी पत्नी मोनी गायकवाड आणि नंतर पुतण्या दीपक गायकवाड यांची गोळी झाडून हत्या केली.ही घटना घडली तेव्हा एसीपी भरत गायकवाड यांची आई आणि दोन मुलेही घरात होती.पहाटे गोळी झाडण्याचा आवाज ऐकताच त्यांनी खोलीकडे धाव घेतली.मात्र तोपर्यंत सगळं संपलं होत
हत्याकांडानंतर गायकवाड यांच्या घाबरलेल्या मुलांनी या घटनेबाबतची माहिती फोनद्वारे पोलिसांना दिली.त्यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता घरात सुसाईड नोट आढळून आलेली नाही.त्यामुळे या घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास करण्यात येत आहे,पोलीस दलात सहाय्यक आयुक्तपदासारख्या वरिष्ठ पातळीवर काम करत असलेल्या अधिकाऱ्याने दुहेरी हत्येनंतर स्वत:ही आत्महत्या केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.भरत गायकवाड यांनी पत्नी आणि पुतण्याची हत्या करून आत्महत्या का केली,याबाबत पोलीस तपासात माहिती समोर येणार आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.