साकोरा- नांदगाव रस्त्यावर अपघात एक जण ठार

गर्जा महाराष्ट्र 24 न्युज वृत्तसेवा
साकोरा ता.20 नांदगाव – साकोरा रस्त्यावर गिरणानगर ग्रामपंचायत हद्दीत पिक अप आणि मोटारसायकल अपघातात तालुक्यातील दहेगाव येथील एक जण ठार झाला असून पिकअप चालकाविरुद्ध नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरूवार (ता.२०) रोजी दुपारी नांदगाव – साकोरा रस्त्यावर गिरणानगर येथे एम.एच.१९बी.एम.२७३५ पिकअप नांदगाव कडून उड्डाणपूलाकडे जात असतांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरील एम.एच.१५ सी.एक्स.८५१० हिरो होंडा स्पे्लंडर गाडीला जबर धडक देवून दोन पलट्या घेवून गाडीची दिशा बदलली या अपघातात तालुक्यातील दहेगाव येथील मोटारसायकल चालक बाळासाहेब तुकाराम जाधव (४०) यांना डोक्याला जबर मार लागला त्यांना उपस्थितांनी उपचारासाठी तात्काळ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.बाळासाहेब जाधव यांना दोन मुली व मुलगा असा परिवार असून तीन महिन्यांपूर्वी एका मुलीचा विवाह झाला असून जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने दहेगाव परिसरात शोककळा पसरली आहे.सायंकाळी दहेगाव येथे बाळासाहेब जाधव यांचेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.





