ताज्या घडामोडी

नांदगाव तालुक्याच्या राजकारणात खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या नियुक्त्या जाहीर

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा

नांदगाव,ता.२९ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुक्यातील संघटनात्मक पुर्नरचना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली असून नवे तालुकाध्यक्ष म्हणून महेंद्र बोरसे यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी पक्षाचे नेते अनिल देशमुख
राजेश टोपे,एकनाथ खडसे,जितेंद्र आव्हाड,कोंडाजी मामा आव्हाड,गजूनाना शेलार,गोकुळ पिंगळे हे उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष आसलेल्या निलेश चव्हाण यांच्यावर राष्ट्रवादी च्या किसान सेलच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे..अन्य नियुक्ती मध्ये अनिल वाघ यांच्यावर विधानसभा अध्यक्ष तर माजी नगराध्यक्ष चेतन पाटील यांच्या वर शहराध्यक्ष पदाची तर मनमाडचे शहराध्यक्ष म्हणून सुधीर पाटील यांची किसान सेलचे तालुका सरचिटणीस पदाची जबाबदारी मच्छिंद्र वाघ यांची नियुक्ती करण्यात आली.


आज मुंबई येथे राष्ट्रवादी कार्यालयात पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील माजी गृहमंत्री अनिल देशमुख आरोग्यमंत्री राजेश टोपे माजी आमदार हेमंत टकले, गजानन शेलार माजी आमदार दिपीका चव्हाण यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निलेश देविदास चव्हाण,मच्छिंद्र वाघ,रणखेडा गावचे सरपंच शांतारामजी शिंदे,परसराम नामदेव शिंदे,राकेश अशोक चव्हाण, महेंद्र भगवान बोरसे यांनीही प्रवेश केला

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.