ताज्या घडामोडी

पालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती उमाकांत घोंगाने यांचे निधन :बुधवारी सकाळी अंत्यविधी

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृतसेवा
नांदगाव,ता २९ पालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती,भाजपाचे जेष्ठ नेते व प्रसिद्ध कांदा आडतदार उमाकांत ( उर्फ अण्णा )शिवलिंग घोंगाने ( ६६) यांचे आज सांयकाळी नाशिक येथे अल्पआजाराने दुःखद निधन झाले उद्या सकाळी बाजार समितीच्या आवरामागील जय भवानी यार्ड येथे उद्या सकाळी नऊ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत
१९८५ ला ते पालिकेचे नगरसेवक होते याच काळात नगरसेवक पदासोबतच पालिका शिक्षण मंडळाच्या सभापती झालेल्या उमाकांत घोंगाने यांनी हे पद तब्बल बारा वर्षे सांभाळले भाजपचे पदाधिकारी म्हणूनही त्यांनी काम बघितले त्यांच्या एवढा दीर्घकाळ नंतर कुणालाही मिळाला नाही या काळात त्यांनी शहरातील प्राथमिक शाळांचा दर्जा राखण्यासाठी निरनिराळे उपक्रम राबविले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आडतदारी व्यवसायात उडी मारली आणि एक यशस्वी आडतदार अशी प्रगती त्यांनी केली अत्यंत मितभाषी,कणखर स्वभाव,सर्व कुटुंबाला बरोबर घेऊन चालणारे उत्तम व्यक्तिमत्व आज काळाच्या पडदया आड़ गेले. आपल्या दोघा भावांना सोबत घेत त्यांनी व्यावसायिकतेत स्वतःसोबतआपल्या कुटुंबाला देखील प्रतिष्ठा मिळवून दिली.त्यांची लेक लंडनला कर्करोगावरील संशोधक म्हणून कार्यरत आहे सोमनाथ घोंगाने राजेंद्र घोंगाने यांचे ते थोरले भाऊ तर निलेश घोंगाने यांचे ते वडील होत
आमदार सुहास कांदे यांच्यासह शहरातील आडतदार,व्यापारी,राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील विविध नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उमाकांत घोंगाने यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.