ताज्या घडामोडी

नांदगांव च्या व्ही.जे.हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची नगरपरीषदेला भेट …

विद्यार्थ्यांनी नगरपालिकेची जाणून घेतली कार्यपद्धती

गर्जा महाराष्ट्र24न्यूजवृतसेवा

नांदगाव ता.०४:- येथील वैजनाथ जिजाजी विद्यालयाच्या इयत्ता आठवीच्या विद्यार्थीनींनी ‘स्वानंद’ ह्या अभिनव उपक्रमांतर्गत नांदगाव नगरपालिकेला भेट देवून कार्यपद्धती जाणून घेतली.

ह्याप्रसंगी नगरपरीषदेचे कर अधिक्षक राहुल कुटे ह्यांनी विद्यार्थ्यांना नांदगाव नगरपरीषदेच्या स्थापनेची पार्श्वभूमी सांगत विविध सेवा जसेकी सार्वजनिक पाणीपुरवठा विभाग,बांधकाम,आरोग्य,
स्वच्छता विभाग,विविध करभरणा विभाग,अर्थविभाग ते रस्तादुरूस्ती असो वा घंटागाडी किंवा विविध दाखले वा आयुक्तांचे दालन..इ. बाबी व विभागांच्या कार्यपद्धतीविषयी विद्यार्थ्यांना मनमोकळ्या संवादाद्वारे अवगत केले,यावेळी नगरपालिकेचे कर निरीक्षक.राहुल कुटे ह्यांनी ह्यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांचीही उत्तरे दिली.

ह्यावेळी नगरपालिका कर्मचारी विजय कायस्थ,अरुण निकम,अंबादास सानप,श्रीमती रोशनी मोरे,रवी चोपडे,आनंद महिरे,निलेश देवकर आदी कर्मचारी उपस्थित होते.शालेय समिती अध्यक्ष संजीव धामणे ह्यांची संकल्पना तसेच मुख्याध्यापक मनोहर बडगुजर, उपमुख्याध्यापक दिपक बाकळे,पर्यवेक्षक मनोहर शिंदे आदींची प्रेरणा लाभलेल्या ह्या उपक्रमासाठी इयत्ता ८ वी ‘अ’ तील विद्यार्थीनींना वर्गशिक्षक प्रविण अहिरे ह्यांनी मार्गदर्शन केले.त्यांना विद्यालयातील चंद्रकांत दाभाडे,स्वप्निल पाटील आदींचे सहकार्य लाभले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.