ताज्या घडामोडी

बारा बुलतेदारांचे नशीब पालटणार, विश्वकर्मा योजना ठरेल वरदान

१७ सप्टेंबर रोजी विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने'विश्वकर्मा योजना'सुरू होणार

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

बाबासाहेब कदम
बाणगाव बुद्रुक ता.०५ देशातील सुतार,कुंभार,धोबी,मुर्तीकार, शिल्पकार यासह अनेक कारागीरांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला असून.देशातील 30 लाख कारागीरांचे नशीब पीएम विश्वकर्मा योजनेमुळे बदलणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी आपल्या भाषणात विश्वकर्मा योजनेचे संकेत दिल्यानंतर लगेचच केंद्रीय मंत्रिमंडळाने नवीन विश्वकर्मा योजनेला मंजुरी दिली आहे.याद्वारे गुरू-शिष्य परंपरेअंतर्गत कौशल्य कार्यात गुंतलेल्या कामगारांचा कौशल्य विकास केला जाणार आहे.


तेरा हजार कोटी रुपयांच्या या योजनेचा फायदा देशातील ३० लाख पारंपरिक कारागिरांना होणार आहे.त्यांना एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे.त्यावरील कमाल व्याज ५ टक्के असेल.एक लाखाच्या मदतीनंतर पुढील टप्प्यात २ लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध केले जाणार आहे.ही योजना १३ हजार कोटी रुपयांची असून,३० लाख पारंपरिक कारागिरांना याचा लाभ होणार आहे.लहान शहरांमध्ये गुरू-शिष्य परंपरेनुसार कौशल्यासंबंधीच्या कामात विविध वर्ग गुंतले आहेत.यामध्ये,सुतार,लोहार,कुंभार,गवंडी,धोबी, फूलकाम करणारे,मासे पकडायचे जाळे विणणारे,कुलपे तयार करणारे,शिल्पकार,आदींचा समावेश होतो.या योजनेद्वारे त्यांना पतपुरवठ्याची सुविधा आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्याकरिता आहेत.मदत केली जाणार आहे.

दृष्टिक्षेपात विश्वकर्मा योजना***
पीएम विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या टप्प्यात १८ पारंपरिक उदयोगांचा समावेश, पारंपरिक कारागीर आणि कारागिरांच्या ३० लाख कुटुंबास होणार फायदा योजनेंतर्गत मूलभूत आणि आधुनिक असे दोन प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार.
प्रशिक्षणादरम्यान दररोज ५०० रुपये मानधनही दिले जाईल
•आधुनिक साधने खरेदी करण्यासाठी सरकार १५ हजार रुपयांची मदत करणार.
• ब्रेडिंग,ऑनलाईन मार्केट अॅक्सेस यासारखी मदत केंद्र सरकारकडून दिली जाणार आहे.

येत्या १७ सप्टेंबरला सुरुवात….
येत्या १७ सप्टेंबर रोजी विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने’विश्वकर्मा योजना’सुरू करण्यात येणार आहे.याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही वाढदिवस आहे.विश्वकर्मा योजनेचा उद्देश कौशल्य प्रशिक्षण, तंत्रज्ञान आणि आर्थिक साहाय्य देऊन देशभरातील कारागीर आणि कारागिरांच्या क्षमता वाढवणे हा आहे.या योजनेंतर्गत कुशल कारागिरांना एमएसएमई म्हणजेच सूक्ष्म,लघू आणि मध्यम उद्योगांशी जोडले जाणार असून,त्यामुळे त्यांना खात्रीची आणि मोठी बाजारपेठ मिळू शकेल.

प्रतिक्रिया★★★★

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या विश्वकर्मा योजनेचे माध्यमातून ग्रामीण भागातील बारा बुलतेदारांचा आर्थिक विकास होणार आहे,आजच्या महागाईच्या काळात १ लाखात व्यवसाय सुरू करता येत नाही यात कर्ज मर्यादा वाढविणे गरजेचे आहे,सबसिडी कर्ज योजनेत बॅंकां सहकार्य करत नाही,कर्ज मंजूर झाल्यावर लाभार्थ्यांच्या कर्ज रक्कम त्वरित जावी
संजय कदम – अध्यक्ष नांदगाव तालुका खादी ग्रामोद्योग संघ

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.