ताज्या घडामोडी

जातेगाव – वसंतनगर बंजारा तांड्यावर” तिजची ” धामधूम

तिज उत्सवात समाजातील महिला आपल्या पारंपरिक पोशाख करून सहभागी

गर्जा महाराष्ट्र24न्यूज वृत्तसेवा

नांदगाव ता.०५  श्रावण महिन्यात बंजारा समाजाच्या वतीने ‘तीज’ हा सांस्कृतिक महोत्सव साजरा केला जातो ०१  सप्टेंबर ला नांदगांव तालुक्यातील वसंतनगर परिसरातील बंजारा समाजाच्या वतीने तीज उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते

.वसंतनगर गावात वेगवेगळ्या भागातून नोकरी, व्यवसाय व शिक्षणाकरिता स्थायिक झालेला बंजारा समाज एकत्र येऊन आपले सांस्कृतिक वेगळेपण आजही जपत आहे.श्रावण महिना म्हणजे बंजारा समाजातील तरुणींसाठी आनंदाचे हे पर्व, सर्व हेवेदावे विसरून या तरुणी ‘तिजोत्सव’ची स्थापना करून आनंद लुटतात. बंजारा समाजाने ८०० वर्षांपासून पूर्वीपासून तिजोत्सव ही पारंपरिक प्रथा जोपासली आहे. यामध्ये पहिल्या दिवशी तरुणी रानावनात जाऊन तेथील वारुळाची माती आणून टोपलीत टाकतात. त्यानंतर त्यामध्ये गहू टाकत जवाराची स्थापना करतात.


सकाळी आणि संध्याकाळी पारंपरिक बंजारा लोकगीत गात या तरुणी घरोघरी जाऊन त्या टोपल्यात पाणी टाकतात. न चुकता सलग नऊ दिवस ही प्रक्रिया चालते. या दिवसात गहू अंकुरित होऊन स्त्रिया व मुलींनी हिरिरीने सहभाग घेत, संत सेवालाल महाराज पोहरगड,देवी सामकी माता,देव-देवतांची नावाने फेर धरत नृत्य केले जाते.

१ सप्टेंबर ला नांदगांव तालुक्यातील  वसंतनगरसह अन्य भागात तिजोत्सव रंगणार होता. यावेळी बंजारा समाज तीज उत्सावाचे पदाधिकारी रल एन के राठोड यांनी सांगितले की,‘गोर बंजारा समाजामध्ये तीज उत्सव अनादिकालापासून मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. समाजाच्या रुढी-परंपरा टिकून राहाव्यात; तसेच अशा उपक्रमाच्या माध्यमातून सर्व समाज एकत्र येत असतो. या उत्सवात दोनशेहून अधिक कुटुंबे सहभागी झाली आहेत. बंजारा समाजाच्या रुढी-परंपरा जपून ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’

पारंपरिक पोशाखातील महिलांच्या नृत्याने फुलले तांडे, पावसाळ्यातील परंपरा आजही बंजारा समाजबांधवांकडून कायम

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.