ताज्या घडामोडी

नांदगाव तालुक्यात जामदरी येथे बसचा अपघात .

शाळकरी विद्यार्थ्यांसह प्रवासी जखमी

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगाव ता.०६ तालुक्यातील जामदरी फाट्यावर नांदगाव आगाराची बसच्या अपघातात शाळकरी मुले व प्रवांशी गंभीर जखमी झाले असल्याचे समजते.. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बस क्रमांक एमएच १४ बीटी ३८०६ ही गिरणाडॅमकडून नांदगावकडे येत असताना सदर बस जामदरी फाट्याजवळ आली असता बसचे पाटे तुटल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.या बसमध्ये अंदाजे ५० ते ५५ प्रवाशी होते. त्यामध्ये शाळकरी मुले आणि इतर प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. या बसमध्ये प्रवाशी,शाळकरी मुले साकोरा व नांदगाव येत असतात.या बस अपघातील जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत..

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.