ताज्या घडामोडी

नांदगांव ला कॅप्टन विक्रम बत्रा यांना जयंतिनिमित्त विनम्र अभिवादन

गर्जा महाराष्ट्र24 न्युज वृत्तसेवा

नांदगाव ता.०९ येथील सौ .क.मा.कासलीवाल माध्यमिक विद्यालयात
कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करताना मुख्याध्यापक शरद पवार यांनी विद्यार्थ्यांना कॅप्टन विक्रम बत्रा यांचा जीवनपट उलगडून दाखविला.

कॅप्टन विक्रम बत्रा हे भारतीय सेनादलातील एक अधिकारी होते. ६ जुलै १९९९ रोजी कारगिल युद्धात पॉइंट ५१४०,पॉइंट ४८७५,कारगिल (काश्मीर) येथील कारवाई दरम्यान दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार परमवीरचक्र हा मरणोत्तर प्रदान करण्यात आला.ते भारतीय स्थल सेनेतील १३ वी बटालियन,जम्मू काश्मीर रायफल्स मध्ये कॅप्टन पदावरील अधिकारी होते.त्यांच्या देशसेवेचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन मुख्याध्यापक शरद पवार यांनी केले. तसेच नॅशनल डिफेन्स अँकेडमी निवड प्रक्रियेबद्दल महत्त्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.