लिटल स्टार व रेंबो इंटरनॅशनल स्कुल मध्ये दहीहंडीचा जल्लोष
श्रीकृष्ण, राधेच्या वेशभूषेतील चिमुकले सोहळ्याचे प्रमुख आकर्षण

गर्जा महाराष्ट्र24 न्यूज वृत्तसेवा
नांदगांव ता. ९: येथील नमन शिक्षण संस्था संचलित लिटल स्टार इंग्लिश स्कुल व रेंबो इंटरनॅशनल इंग्लिश स्कुल मध्ये सालाबादप्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला निमित्त दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.विद्यार्थ्यांनी दहीहंडीच्या भोवती फेर धरून गोविंदा रे गोपाला’अशा श्रीकृष्णाच्या गीतांवर ठेका धरला,श्रीकृष्ण व राधेच्या वेशभूषा परिधान केलेले चिमुकले विद्यार्थी प्रमुख आकर्षण ठरले.

संस्थेचे अध्यक्ष संजय बागुल उपाध्यक्षा सरिता बागुल, डॉ गणेश चव्हाण,बागुल,अड विद्या कसबे यांच्या हस्ते राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेचे पूजन केले व श्रीकृष्ण व राधाच्या वेशभूषेतील विद्याथ्यांचे पूजन करण्यात आले. प्रिन्सिपल अनुराधा खांडेकर व स्मिता सूर्यवंशी यांनी श्रीकृष्ण जन्माची माहिती व गोपाळकाल्याचे महत्व स्पष्ट केले.श्रीकृष्ण आणि राधेच्या वेषभूषेत विद्यार्थ्यांनी स्कुलला हजेरी लावली.

![]()

नर्सरी ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदाचे एकावर एक असे ३ थर तयार करत गोविंद हरी गोपाळ बोलो च्या गजरात दहिहंडी फोडली. यावेळी स्कुल च्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत प्राविण्य मिळविले विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांचे हस्ते मेडल देण्यात आले यावेळ शालेय स्कुल कमिटीच्या वतीने अड विद्या कसबे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत स्कुलच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वीते साठी स्कुलचे शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मेहनत घेतली



