ताज्या घडामोडी

क्रांतीनगर ग्रामपंचायत येथे सभामंडप सुशोभीकरण व काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन संपन्न

नांदगाव : क्रांतीनगर येथे विविध विकासकामांचे उद्घाटन

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगांव ता.०९ तालुक्यातील क्रांतीनगर येथे शुक्रवारी (दि. ८) विविध विकासकामांचे उद्घाटन आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थित पार पडले. क्रांतीनगर येथे काँक्रिटरस्त्याचे भूमिपूजन,सभामंडप सुशोभिकरणाचे उद्घाटन आमदार सुहास आण्णा कांदे यांनी महिलांचा सन्मान राखत सरपंच पूनम जेजूरकर यांच्यासह उपस्थित महिलांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार कांदे यांनी महिलांना सन्मान दिल्याने व त्यांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन केल्याने उपस्थित ग्रामस्थांनी आमदार कांदे यांना धन्यवाद देवून त्यांचे आभार मानले. यावेळी विष्णू निकम,अमोल नावंदर, उपसरपंच युवराज डोळे, सदस्य सौ.मंगला मोकळं,संगीता नागरे, इंदूबाई गायकवाड,प्रियांका पाटील,बेबिबाई ककळीज,सचिन मोकळं, कडूबाई काळे,आत्माराम जेजुरकर बाळासाहेब मोकळ निवृत्ती मोकळ योगेश मोकळ अशोक मोकळ संदीप जेजुरकर भास्कर जेजुरकर अनिल पाटील अशोक नरोटे अशोक गायकवाड अमोल काळे वनाजी आयनोर सुनील नरोटे ज्ञानेश्वर जेजुरकर दिगंबर भागवत छायाताई जेजुरकर मंगला मोकळे शांताबाई सरला जेजुरकर पल्लवी आहेर जयश्री जेजुरकर सुमन जेजुरकर चंद्रकला जेजुरकर दिनकर जाधव गोपाळ भस्मे जितेंद्र आहेर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.